Sugarcane Crisis : उसाला प्रति टन ५००० रुपयांची पहिली उचल देण्याची ऊस उत्पादकांची मागणी
Farmers Protest : पंढरपूर यंदाच्या गळीत हंगामातील उसाला पाच हजार रुपये पहिली उचल जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली ऊसदर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. २९) करकंब येथील श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गव्हाणीत ठिय्या देत गाळप पूर्णपणे बंद पाडले.
Demand for 5000 rupees sugarcane first installmentAgrowon