Shabari Naturals Packaging : आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा डंका! ‘शबरी नॅचरल्स’च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाइन अवॉर्ड’
Global Recognition : नाशिक महाराष्ट्र शासनाच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रँडच्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ (जी-मार्क) जाहीर झाला आहे. जागतिक स्तरावर डिझाईन क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या या सन्मानामुळे महाराष्ट्रातील आदिवासी कला, संस्कृती आणि नैसर्गिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे. यापूर्वी या पॅकेजिंगला देशातील ‘इंडिया डिझाईन मार्क’ पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
Shabari Naturals packaging wins Japan Good Design Awardagrowon