Agriculture AI Agrowon
टेक्नोवन

AI In Agriculture : कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित 'कृषी २४/७' पोर्टल येणार शेतकऱ्यांच्या भेटीला; केंद्रीय कृषी विभागानं दिली माहिती

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाने ६ नोव्हेंबर रोजी या संबंधीची माहिती दिली आहे. त्यासाठी वाधवाणी इंस्टीट्यूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेंस या कृत्रिम बुद्धिमत्तातील क्षेत्रातील खाजगी कंपनीची मदत कृषी मंत्रालय घेणार आहे.

Dhananjay Sanap

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी २४/७ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पोर्टल शेतकऱ्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाने ६ नोव्हेंबर रोजी या संबंधीची माहिती दिली आहे. त्यासाठी वाधवाणी इंस्टीट्यूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेंस या कृत्रिम बुद्धिमत्तातील क्षेत्रातील खाजगी कंपनीची मदत कृषी मंत्रालय घेणार आहे. कृषी २४/७ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध पिकांचं व्यवस्थापन आणि पीक संरक्षणाची माहिती देण्याचा उद्देश असल्याचा दावा केंद्रीय कृषी मंत्रालयाने केला आहे.

कृषी २४/७ एआय आधारित असल्याने त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रादेशिक भाषेत विविध माहिती जसे की, पीक रोगावरील किड किंवा सरकारी सुविधा यांची उपलब्ध करून दिली जाणार आहे. कृषी २४/७ शेती संबंधित विविध माहिती गोळा करून त्या माहितीला लेख किंवा बातमीच्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहचवणार आहे. यामध्ये लेख, बातमी किंवा माहितीची प्रासंगिकता ओळखून त्यावर आधारित सूचना शेतकऱ्यांना पाठवेल, तसेच शेतकऱ्यांनी त्यानुसार निर्णय घेण्याचे आवाहन करेल, अशी कृषी मंत्रालयने माहिती दिली.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेती क्षेत्रातील वापराचे जाणकारांनी स्वागत केले आहे. परंतु कृषी २४/७ पोर्टलवर दिलेली माहिती अचूक असेल का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कारण कृषी २४/७ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित असल्याने गोळा केलेल्या माहितीचं विश्लेषण करताना त्यामध्ये अचूकतेची अडचण निर्माण होऊ शकते, असा अभ्यासकांचं मत आहे.

कृषी २४/७ च्या माध्यमातून केंद्र सरकारला मिळणाऱ्या माहितीतून शेती धोरण निर्मितीलाही फायदा होऊ शकतो. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, "कृषी २४/७ मध्ये शेती विषयक माहिती गोळा करण्याची आणि त्यावर आधारित बातमी वा लेख तयार करून शेतकऱ्यांना वेळेवर पाठवण्याची क्षमता असेल. तसेच विविध प्रादेशिक भाषेतील माहिती इंग्रजीत भाषांतर करून त्यावरून बातमी किंवा लेख लिहिण्याची क्षमता असेल. त्यावर बातमीचा मथळा, पिकाचे नाव, सुचनेचा प्रकार, तारीख आणि ठिकाणाचा उल्लेख असेल. त्यामुळे कृषी मंत्रालयाला मिळालेली माहिती आणि सूचना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कृषी २४/७ फायदेशीर ठरणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.

वाधवाणी एआय या खाजगी कंपनीने कोविड-१९च्या दरम्यान एआयचा वापर करून विविध टुल विकसित केले होते. दरम्यान, कृषी २४/७ साठी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) हिंदी आणि इंग्लिश भाषेबरोबरच प्रादेशिक भाषेत माहिती पुरवणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

Marathwada Water Storage: मराठवाड्यात ११ मोठ्या प्रकल्पांत १७६ टीएमसी उपयुक्त साठा  

Turmeric Varieties: सरस उत्पादकतेचे हळदीचे वाण विकसित करणार

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

SCROLL FOR NEXT