टेक्नोवन

Biogas Plant : ‘स्मार्ट मीटर’ दाखवणार बायोगॅस संयंत्राची कार्यक्षमता

टीम ॲग्रोवन

पुणे ः कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दूधशास्त्र विभागाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी गाईंचे संवर्धन (Indigenous Cow Conservation) करण्यात येत आहे. त्याचबरोबरीने भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान (Embryo Transplantation Technology) अवलंब, देशी गोपालन (Indigenous Cow Rearing) शाश्‍वत होण्यासाठी शेण, गोमूत्रावर प्रक्रिया करून विविध सेंद्रिय खते (Organic Fertilizer) तसेच बायोगॅस निर्मिती (Biogas Production) करण्यात येते.

या प्रक्षेत्रावरील बायोगॅस संयंत्रातून दर तासाला किती बायोगॅस निर्मिती होते. तसेच मिथेन उत्सर्जनाची नोंद करण्यासाठी स्मार्ट डिजिटल बायोगॅस मीटर बसविण्यात आला आहे. याबाबत प्रकल्पातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने म्हणाले, ‘‘सध्या जागतिक तापमानवाढीस मिथेन वायूचे उत्सर्जन कारणीभूत आहे.

बायोगॅस संयंत्रातून मिथेन वायू उत्सर्जित होतो. त्यावर नियंत्रण करणे आवश्यक आहे. यामुळे आमच्या प्रक्षेत्रावरील बायोगॅस संयंत्रावर स्मार्ट डिजिटल बायोगॅस मीटर बसविलेला आहे. यामुळे एक किलो शेणापासून किती बायोगॅस तयार होतो, हे तपासणे तसेच उत्पादित मिथेन उत्सर्जनाच्या नोंदणीमुळे कार्बन क्रेडिट मिळवण्यासाठी याचा भविष्यात वापर करणे सोपे जाईल.

या मीटरमुळे दर तासाला बायोगॅस उत्पादन तसेच डायजेस्टर प्रेशरची माहिती मिळते. यासाठी एक स्वतंत्र लॉगिंग आयडी तयार केला आहे. आपण कोणत्याही संगणकावरून ही माहिती मिळवू शकतो.’’ ‘‘या प्रकल्पासाठी आम्ही एका स्टार्टअप कंपनीबरोबर काम करत आहोत.

हवामान बदलाच्या काळात पर्यावरणपूरक शाश्वत देशी गोपालनाला चालना देण्याचा उद्देश आहे. आमच्या प्रकल्पामध्ये शेण, गोमूत्राचा वापर करून गांडूळ खत, फॉस्फरसयुक्त सेंद्रिय खत, विविध जिवाणूयुक्त बायोस्लरी निर्मितीदेखील केली जाते,’’ असेही डॉ. माने म्हणाले. हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे, डॉ. प्रमोद साखरे, डॉ. सुनील अडांगळे प्रयत्न करत आहेत.

शाश्‍वत ऊर्जा आणि सेंद्रिय खताच्या उपलब्धतेसाठी सुधारित बायोगॅस संयंत्र फायदेशीर आहे. आज अनेक बायोगॅस संयंत्रे योग्य व्यवस्थापन नसल्याने बंद आहेत. परंतु सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, डिजिटल मॉनिटरिंग यंत्रणांच्या वापराने बायोगॅस संयंत्र अधिक कार्यक्षमतेने वापरणे शक्य आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.
डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT