Hydroponics Farming  Agrowon
टेक्नोवन

Hydroponics Technology : ‘हायड्रोपोनिक मशिन’साठी पेटंट

Agriculture Technology : कृषी तंत्रज्ञानामध्ये पाण्यावरील हायड्रोपोनिक शेती हा पारंपरिक माती-आधारित शेतीला शाश्वत पर्याय म्हणून समोर येतो आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : कृषी तंत्रज्ञानामध्ये पाण्यावरील हायड्रोपोनिक शेती हा पारंपरिक माती-आधारित शेतीला शाश्वत पर्याय म्हणून समोर येतो आहे. या जलाधारित शेतीच्या अनुषंगाने जगभरात सुरू असलेल्या संशोधनामध्ये शिवाजी विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांनीही आघाडी घेतली आहे.

‘हायड्रोपोनिक प्लांटेशन हेल्थ मॉनिटरिंग मशिन’ या अभिनव संशोधनासाठीचे भारतीय पेटंटही त्यांना प्राप्त झाले आहे. डॉ. सुनीता जाधव (वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बु.), डॉ. सुजित जाधव (वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख, श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड), डॉ. शिवराज थोरात (सहाय्यक ग्रंथपाल, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), ऋतुराज जाधव (संगणक अभियंता), गजानन मोहिते (जयवंतराव भोसले कृषी महाविद्यालय, रेठरे बु.) आणि प्रा. अविनाश कणसे (भारती विद्यापीठ, पुणे) यांनी या ‘हायड्रोपोनिक प्लांटेशन हेल्थ मॉनिटरिंग मशिन’चे डिझाईन यशस्वीरीत्या तयार केले आहे.

यासंदर्भात संशोधक चमूचे सदस्य डॉ. शिवराज थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, हायड्रोपोनिक म्हणजे फक्त पाण्याचा वापर करून केलेली शेती. पारंपरिक मातीआधारित शेतीला पर्याय म्हणून ही शेती गतीने पुढे येत आहे. अशा या हायड्रोपोनिक शेतीची कार्यक्षमता, उत्पादकता आणि शाश्वतता वाढविण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे.

प्रगत सेन्सर्स, रिअल-टाइम डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि स्वयंचलित नियंत्रण प्रणालींमुळे हे यंत्र पिकांचे आरोग्य, वाढ, बदलत्या परिस्थितीचे निरीक्षण, व्यवस्थापन करते आणि हायड्रोपोनिक शेतीची उत्पादकता वाढविण्यास मदत करू शकते. यामध्ये वनस्पतींना आवश्यक असणारी मूलद्रव्ये पाण्यासोबत दिली जातात.

या शेतीप्रकारामध्ये वापरले जाणारे पाणी, त्याचे तापमान, पीएच, मूलद्रव्ये, सभोवतालचे वातावरण यामध्ये काही बदल घडल्यास त्याची हानी पिकांना पोहचते. पिकांची हानी होऊ नये आणि पिकाची कार्यक्षमता, उत्पादकता वाढावी यासाठी सदर उपकरणाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. हे उपकरण भविष्यात अन्नधान्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी या संशोधकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्रीत ३४ टक्के वाढ; खरेदीला पसंती का?

Farmer Justice: अखेर अपघातग्रस्त ट्रॅक्टर शेतकरी कुटुंबाला मिळाला परत!

Agriculture Success Story: बचत गट ते शेतकरी उत्पादक कंपनी

Cotton Bag Scam: कापूस पिशव्यांच्या खरेदीत गैरव्यवहार, चौकशी अहवाल कृषी आयुक्तालयास सादर

Farm Pond: शेततळ्यांसाठीचे १७ हजारांवर अर्ज रद्द

SCROLL FOR NEXT