Jalgaon News: बाजारात आवळ्यांची आवक सुरू झाली असून, शहरातील ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वर्षभर टिकणारे लोणचे, कॅण्डी, मुरब्बा यांसारखे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी आवळा मोठ्या प्रमाणावर खरेदी केला जात आहे. सध्या बाजारात आवळा प्रतिकिलो ६० ते ८० रुपये दराने उपलब्ध असून, मागणी सतत वाढत आहे..दिवाळी संपल्यानंतर डिसेंबर महिन्यात गृहिणी आवळ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. घरगुती उपयोगासाठी चार ते पाच किलो आवळा विकत घेण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेक महिला तर घरीच ‘च्यवनप्राश’सारखी मिश्रणेही बनवतात..Agrowon Podcast: सिताफळाची आवक वाढली; आवळ्याला कमी उठाव, हिरवी मिरची नरमली, लिंबुचे दर टिकून, लसणाचे दर स्थिर.हिवाळा सुरू झाल्याने आवळा सेवनाचा हंगाम रंगत असून, पुढील काही आठवड्यांत बाजारात आवक वाढल्याने दर काहीसे स्थिर राहतील, असा अंदाज आहे. शहरात नागरिकांकडून आवळ्याला मिळणारा प्रतिसाद पाहता यंदा आवळ्याच्या पदार्थांना मोठी मागणी राहणार आहे..Amla Juice Hair Growth : केसांच्या वाढीसाठी आवळ्याचा रस आहे प्रभावी.‘क’ जीवनसत्त्वाचा खजिनाआवळ्यात नैसर्गिकरित्या विपूल प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असल्याने ते शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. विशेष म्हणजे, आवळा शिजवला तरी त्यातील जीवनसत्त्वाचे नुकसान होत नाही. .त्यामुळे गूळ किंवा साखरेच्या पाकात शिजवलेले मुरब्बा, कँडी तसेच आवळा-आले रस, मिरची घालून केलेले लोणचे, आवळ्याचा ठेचा, सुंठ-आवळा मिश्रणे असे अनेक प्रकारचे पदार्थ गृहिणी आवडीने बनवतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.