Agriculture Technology  Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : ‘आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर’

Agriculture Drone : तेलबिया क्षेत्र वाढ़, फळबाग व्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, हळद, ओवा, जिरे, सोप क्षेत्र वाढ करण्यासह जोड धंद्याचे महत्त्वसुद्धा डॉ. खर्चे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Akola News : ‘‘कृषी विद्यापीठांनी कालसुसंगत शेती संशोधनाचे कार्य योग्यरीत्या केले आहे. आता कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या सहयोगातून आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान गाव पातळीवर वेळेत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने फायदेशीर आहे,’’ असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी केले.

बाळापूर तालुक्यातील मौजे देगाव येथे गुरुवारी (ता. २१) आयोजित कांदा पीक व्यवस्थापन शेतीशाळेत ते बोलत होते. तेलबिया क्षेत्र वाढ़, फळबाग व्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, हळद, ओवा, जिरे, सोप क्षेत्र वाढ करण्यासह जोड धंद्याचे महत्त्वसुद्धा डॉ. खर्चे यांनी व्यक्त केले.

या वेळी सरपंच दीपाली सरदार, शारदा सोनटक्के, ‘पंदेकृवि’चे भाजीपाला व बियाणे पैदासकार डॉ. श्याम घावडे, आत्मा तालुका तंत्र व्यवस्थापक विजय शेगोकार, पोकरा प्रकल्प समन्वयक गोपाल बोंडे, कृषी सहाय्यक एम. बी. राठोड, सुनील ताकवाले उपस्थित होते.

डॉ. घावडे म्हणाले, ‘‘कांद्यामध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असते. कांदा पिकास सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आणि अमोनिअम सल्फेट खत दिले, तर गंधक वेगळा वापरण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे जस्त, लोह व मॅंगेनीज या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरजेनुसार फवारणीदेखील फायदेशीर ठरते.’’

गोपाल बोंडे यांनी शून्य मशागत पद्धती आणि प्रकल्पाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. सुनील ताकवाले यांनी ड्रोनद्वारे फवारणीचे महत्त्व सांगितले. श्री. राठोड यांनी महाडीबीटी आणि कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paus Andaj: ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता; राज्यात पुढील ५ दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

Cloudy Weather : ढगाळ वातावरण कायम; पिकांना फटका

Soybean Rate : सोयाबीन उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट

Sugarcane Worker Support: ऊसतोड कामगारांना तात्काळ आर्थिक मदत द्या: उपसभापती गोऱ्हेंची मागणी

Bacchu Kadu: कर्जाचा हप्ता बँकेत जात नाही; तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, बच्चू कडूंचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT