Mechanization Agriculture Agrowon
टेक्नोवन

Mechanization : कृषी यांत्रिकीकरणासाठी किती अनुदान मिळतं ?

या यांत्रिकीकरणाच्या मदतीनं शेतकऱ्याच्या (Famrer) वेळेची तर बचत होऊच लागली मात्र त्यासोबतच कष्टाचाही भार किंचितसा का होईना पण हलका झाला.

टीम ॲग्रोवन

देशातील कृषी क्षेत्राच्या वाटचालीमध्ये यांत्रिकीकरणाची (Agri Machinery) भूमिका महत्त्वाची आहे. या यांत्रिकीकरणाच्या मदतीनं शेतकऱ्याच्या (Famrer) वेळेची तर बचत होऊच लागली मात्र त्यासोबतच कष्टाचाही भार किंचितसा का होईना पण हलका झाला.

याच यांत्रिकीकरणाला चालना मिळावी म्हणून सरकारच्या पातळीवरून प्रयत्न सुरूच आहेत. आता यंत्र म्हणलं की, आपल्याला आठवतं ते ट्रॅक्टर (Tractor). पण मुद्दा तेवढ्या पुरता मर्यादित नाही. शेत कामासाठी लागणाऱ्या इतरही यंत्र महत्त्वाचे आहेत.

देशातील शेतकऱ्याने या आधुनिक यांत्रिकीकरणाचा वापर करून शेती अधिक जोमाने करता यावी म्हणून केंद्र सरकारने एक योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे 'सब-मिशन ऑन अॅग्रीकल्चर मॅकेनाझेशन' (Sub-Mission On Agriculture Mechanization) म्हणजेच स्माम! (SMAM)

या योजनेतून कृषी यांत्रिकीकरणासाठी केंद्र सरकार अनुदान (Subside) देते. केंद्र सरकार किती टक्के अनुदान देते ? त्यासाठी अर्ज कसा करायचा ? कोणत्या शेतकऱ्याला सरकार अनुदान देते ?

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं ?

स्माम या योजनेत देशातील सर्वच शेतकरी सहभागी होऊ शकतात. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महिलाही अर्ज करू शकतात. अर्जदार शेतकरी ओबीसी, अनूसूचित जाती, जमातीमधील असतील तर त्यांना यंत्र खरेदीवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळतं.

योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?

स्माम या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे ओळखपत्र आवश्यक आहे. त्यासोबतच आधारकार्ड, (Adhar Card) पॅनकार्ड (PAN Card), वाहन चालक परवाना (Driving License) , जमिनीचा सातबारा, पासपोर्ट साईज फोटो आणि बँक पासबुक (Bank Passbook) आवश्यक आहे.

अर्जदार शेतकरी ओबीसी, अनूसूचित जाती जमातीतील असतील तर जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. या योजनेतून अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होते. त्यामुळे बँकमध्ये खाते असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करायचा ?


या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. तो अर्ज कुठे करायचा ? कसा करायचा ? तेही सांगतो. तर स्माम योजनेचा लाभ घेण्यासाठी agrimachinery.nic.in या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागते.

नोंदणी करताना वर जी काही कागदपत्रे सांगितली आहेत, ती अर्जदार शेतकऱ्याने जवळ बाळगावीत. शेतकरी हा अर्ज स्वतच्या मोबाइलवरूनही करू शकतात. त्यासाठी काय करायचं तर ते पाहूया.

ऑनलाइन नोंदणी कशी कराल ?
agrimachinery.nic.in या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन असा पर्याय वेबसाईटवर दिसतो. रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर फार्मर हा पर्याय दिसतो.

फार्मर हा पर्याय निवडल्यानंतर सुरुवातीला त्यामध्ये आवश्यक कागदपत्राची माहिती दिलेली आहे. त्यानंतर अर्जदार शेतकऱ्याने आधार नंबर, मोबाइल नंबर आणि आधार कार्डावरील नाव तिथे नोंद करायचे आहे.

आधार कार्डचा पर्याय निवडल्यानंतर अर्जदार शेतकरी कोणत्या राज्यातील आहे याचीही माहिती द्यायची आहे. महाराष्ट्रातील अर्जदार शेतकऱ्यांनी महाराष्ट्र हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर एक अर्ज ओपन होईल. त्यावर अर्जदार शेतकऱ्याने आपलं नाव, गाव, जिल्हा, वय आदि माहिती भरायची आहे.

ही माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करून अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानंतर आपली ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्याचा एक मेसेज आपल्या आधार संलग्न मोबाइल क्रमांकावर येईल. आणि आपला अर्ज पूर्ण होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT