कृषी क्षेत्रासाठी लागणारी यंत्रे तयार करणाऱ्या जॉन डिअर (John Deere) कंपनीने संपूर्ण ऑटोमॅटिक ट्रॅक्टर (Autonomus Tractor) असा लाँच केला आहे. जॉन डिअर ही कृषी यंत्रांसह (Agricultural Machinery) अवजड उपकरणे आणि डिझेल इंजिन तयार करणारी अमेरिकन कंपनी आहे. कन्जुमर इलेक्ट्रॉनिक शो २०२२ (CES 2022) मध्ये कंपनीने आपला नवा संपूर्ण ऑटोमॅटिक ट्रॅक्टर लाँच केला असून जो मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी तयार आहे.
It's time. Integrated autonomy solutions for @JohnDeere 8R Series tractors. 6 pairs of stereo cameras constantly looking at surroundings and analyzing each pixel for 360° obstacle detection and distance measurements, using deep neural networks #CES2022 pic.twitter.com/DZ1dJwUzwa
कंपनीने लाँच केलेल्या ट्रॅक्टर मॉडेलचे 'Deere's 8R' असे नाव आहे. या ट्रॅक्टरमधील ट्रूसेट तंत्रज्ञानासह खोलवर नांगरणी, जीपीएस गाईडन्स आणि नव्या अॅडव्हान्स तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांसाठी हा ट्रॅक्टर उपलब्ध होणार आहे. जगाची लोकसंख्या २०५० पर्यंत ८ अब्जवरून १० अब्जांवर जाण्याची शक्यता आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जागतिक अन्नाची मागणी वाढणार आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेती करण्याच्या क्षमतेवर होईल.
The future of farming has arrived. Meet our fully autonomous 8R tractor. #CES2022 pic.twitter.com/20oHuIjCu5
8R ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये - या ऑटोमॅटिक ट्रॅक्टरमध्ये १२ स्टेरिओ कॅमेरे (Sterio Camera) आहेत, ज्यामुळे ३६० अंशामधील अडथळे शोधून अंतर मोजणे त्याला शक्य होते. ट्रॅक्टरचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना या ट्रॅक्टरला शेतात नेऊन ऑटोमॅटिक ऑपरेशनसाठी कन्फिगर करणे आवश्यक असते. जॉन डिअर ऑपरेशन सेंटर मोबाईल (operations center mobile john deere) अॅपच्या सहाय्याने ट्रॅक्टर उजवीकडे किंवा डावीकडे वळविता येतो. याशिवाय लाईव्ह व्हिडीओ, फोटो, डेटा आणि मेट्रीक्स दाखविते. तसेच शेतकऱ्याला ट्रॅक्टरचा वेग, नांगराची खोली कमी जास्त करता येते. याशिवाय यामध्ये अजून काही फिचर देण्यात आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.