Mol Nangar  Agrowon
टेक्नोवन

Mol Nangar : कमी निचऱ्याच्या जमिनीसाठी मोल नांगराचा वापर कसा कराल?

Agriculture Equipment : कमी निचरा होणाऱ्या भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी तसेच पिकांचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी मोल नांगराचा वापर केला जातो.

Team Agrowon

कमी निचरा होणाऱ्या भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी तसेच पिकांचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी मोल नांगराचा (Mol Plough) वापर केला जातो.

साध्या नांगराप्रमाणे मोल नांगर ट्रॅक्‍टरला (Tractor) जोडून वापरले जाते. प्रत्येकी ४ मीटर अंतरावर हे नांगर वापरायचे असल्याने नांगरटीपेक्षाही कमी खर्च येतो.

त्यामुळे क्षारपड - पाणथळ जमिनीमध्ये ज्या शेतकऱ्यांची भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धत वापरण्याइतकी आर्थिक परिस्थिती नाही, त्यांना ही पद्धत उपयुक्त ठरते.

पिकाला पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर जमिनीवरील पाणी हे जमिनीमध्ये पडलेल्या फटीतून मोलमध्ये जमा होते. तसेच  जमिनीमध्ये मुरलेले अतिरिक्त पाणीसुद्धा मोलमध्ये जमा होते.असे साठलेले अतिरिक्त पाणी जमिनीच्या उताराच्या दिशेने जमिनीबाहेर वाहून जाते. मोल नांगराद्वारे जमिनीपासून ४० ते ७५ सें.मी. खोलीवर पाइपासारखे पोकळ आडवे छिद्र पाडले जातात, याला मोल निचरा पद्धत असे म्हणतात.

हे मोल नेहमी जमिनीच्या उताराला समांतर काढावे लागतात. मोल पाडत असताना जमिनी

पृष्ठभागापासून मोलपर्यंत जमिनीचा भाग मोल नांगराच्या पातळ प्लेटद्वारे कापला जातो. त्यामुळे जमिनीखालून एक पोकळ फट तयार होते, त्याला मोल म्हणतात.

मोल तयार झाल्यानंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने मशागत करावी. त्यामुळे मोल वाळण्यास वेळ मिळून ते टणक बनतात. 

मोल निचरा पद्धत योग्य पद्धतीने केल्यास ३ ते ५ वर्षे टिकू शकते. कमी निचरा होणाऱ्या भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी दोन मोलमधील अंतर ४ मीटर व खोली ०.६० मीटर ठेवावी. 

मोल निचरा पद्धत वापरण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण ३५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असावे.

जमीन नैसर्गिक उताराची असावी. उतार कमीत कमी ०.२ टक्के असावा. साधारणतः १ ते १.५ टक्के उतार असलेली जमीन मोल निचरापद्धतीसाठी उत्कृष्ट असते.

मोल करताना ४० ते ७५ सें.मी. खोलीवरील मातीमध्ये ओलाव्याचे प्रमाण २० ते २५ टक्के असायला हवे. कारण नांगर ४० ते ७५ सें.मी. खोलीवरून चालवला जातो.

त्यामुळे या खोलीवरील माती कोरडी असेल तर तयार होणाऱ्या मोलच्या कडा कोसळतात. तसेच ओलावा जास्त असेल तर नांगर ओढण्यासाठी वापरलेला ट्रॅक्‍टर जमिनीमध्ये रूतू शकतो.

यासाठी मोल नांगर वापरण्याचे वेळी ज्या खोलीवर नांगर वापरायचा आहे, त्या खोलीवरील मातीतील ओलावा साधारणतः २० ते २५ टक्के असावा.

मोलमधून निचरा होणारे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी शेताजवळ ७५ ते ९० सें.मी. खोलीची उघडी चर असावी.

दोन मोलमध्ये सर्वसाधारणपणे ४ मीटर अंतर ठेवावे. मोलची खोली ४० ते ७५ सें.मी. ठेवावी.

मोलची लांबी सामान्यतः २० ते १०० मीटर ठेवावी.

साधारणतः ७५ किंवा त्यापेक्षा जास्त हॉर्सपावरचा ट्रॅक्‍टर वापरावा. मोल करत असताना ट्रॅक्‍टरचा वेग सामान्यतः १ कि.मी. प्रतितास किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT