टेक्नोवन

Agriculture Technology : तरुणाने तयार केली शेतकऱ्यांसाठी वेबसाईट; शेतमालाचे भाव एका क्लिकवर उपलब्ध

शेतकऱ्यांच्या शेतमालाचे बाजारातील भाव मोबाईलवर पाहता यावेत, यासाठी दिल्लीतील १७ वर्षीय तरूणाने ना नफा तत्वावर 'अमिर किसान' नावाची वेबसाईट चालू केली आहे.

Dhananjay Sanap

शेतकऱ्यांच्या शेतमालाचे बाजारातील भाव मोबाईलवर पाहता यावेत, यासाठी दिल्लीतील १७ वर्षीय तरूणाने ना नफा तत्वावर 'अमिर किसान' नावाची वेबसाईट चालू केली आहे. या तरुणाचे नाव आहे एकाग्र गर्ग. सध्या या वेबसाईटचा फायदा बिहारमधील सिमांचल भागातील शेतकऱ्यांना होतो आहे. पण लवकरचा देशातील सर्व बाजारातील शेतमाल बाजारभाव शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने 'अमिर किसान' पाहता येतील, असा एकाग्रचा प्रयत्न चालू आहे. सध्या या वेबसाईटवर बिहारमधील मका आणि भात पिकाचे बाजारभाव पाहता येतात.

जून महिन्यात त्याने 'अमिर किसान' वेबसाईट चालू केली. त्यावेळी या वेबसाईटला भेट देणाऱ्याची संख्या ६०० होती. कारण शेतकऱ्यांची काढणी सुरू झालेली नव्हती. पण आवकेच्या हंगामात मात्र अमिर किसानला २ हजार शेतकरी भेट देत आहेत. तसेच १७ हजार शेतकऱ्यांनी वेबसाईटवर नोंदणी केल्याचा दावा एकाग्र गर्गने केला आहे.

एकाग्रने सध्या बिहार राज्यातील सिमांचल भागावर लक्ष केंद्रित केले आहे. कारण या भागात पुराचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळणे आवश्यक असते. त्यामुळे एकाग्रने सिमांचल लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांपर्यंत शेतमाल बाजारभाव पोहचवण्यासाठी एकाग्रने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सुरुवातीला एक हजार शेतकऱ्यांना व्हॉटसअपवर बाजारभाव पाठवण्यात येत होते. तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा त्याचा उद्देश आहे.

दरम्यान, एकाग्र गर्ग दिल्लीत शिक्षण घेत आहे. लवकरच अमिर किसानसाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारांची मदत कशी घेता येईल, यासाठी तो प्रयत्न करणार आहे. तसेच खाजगी कंपन्यांशी तो जोडला जाणार आहे, अशी माहिती त्याने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्या कॅबिनेटमध्येच जाहीर करा; राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची मागणी

Sugarcane Season 2024 : कृष्णा कारखान्याचे १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Rabi Season 2024 : सिंधुदुर्गात रब्बी हंगामाला प्रारंभ; मशागतीला वेग

Rabi Season 2024 : सातारा जिल्ह्यात रब्‍बी पिकांच्या पेरणीस वेग

SCROLL FOR NEXT