Crop Harvesting : खरीप हंगामातील बऱ्याचशा पिकांची सध्या काढणी सुरु झाली आहे. सर्व शेतकऱ्यांकडील पिकांची काढणी एकदाच सुरु झाल्यामुळे मजूर मिळत नाहीत. अशावेळी पिकाची काढणीची वेळ उलटून गेल्यामुळे मिळणाऱ्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी पिकाची काढणी जर यंत्राने केली तर मजूरीवरिल खर्चात बचत होते आणि कमी वेळेत पिकाची काढणी करता येते.
कम्बाइन हार्वेस्टर हे यंत्र भात, गहू, हरभरा, सोयाबीन, सूर्यफूल, मूग अशा अनेक पिकांच्या कापणी व मळणीसाठी वापरले जात आहेत. या यंत्रामुळे श्रम, वेळ आणि खर्चात मोठी बचत होते. बाजारामध्ये विविध कंपन्यांच्या हार्वेस्टर मशिन उपलब्ध आहेत. त्यात २ ते ६ मीटर लांबीचे कटर बार असतात. त्याला जोडलेला मशिन रील हे उभे पीक यंत्रातील कापण्याच्या कटरबारपर्यंत पोहोचविण्याचे कम करतो.
कटर बारला जोडलेल्या धारदार ब्लेड्समुळे पिकाची कापणी होते. पिकाच्या ओंब्या, धान्य हे कन्व्हेअर बेल्टद्वारे रेसिंग युनिटपर्यंत पोहोचवले जाते.
तिथे ड्रेसिंग ड्रम आणि काँक्रीट क्लीअरन्समध्ये रगडले जाऊन वेगळे केले जाते. हे मळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हलका भुस्सा वेगळा करण्याची प्रक्रिया (विनोइंग) होते. धान्यासाठी पुढे चाळण्या जोडलेल्या असतात. त्यातून धान्य साफ केले जाते. तिथे बसविलेल्या स्टोन ट्रॅप युनिटमध्ये धान्यात आलेले माती, दगड, बारीक खडे वेगळे केले जातात.
कम्बाईन हार्वेस्टर मशिनचे सामान्यतः तीन प्रकार पडतात.
अ) ट्रॅक्टरचलित कम्बाइन हार्वेस्टर ः या प्रकारच्या कम्बाइन हार्वेस्टर मशिनला ट्रॅक्टरसोबत जोडून चालवले जाते. या हार्वेस्टरला ट्रॅक्टरच्या पीटीओद्वारे ऊर्जा दिली जाते.
ब) स्वयंचलित कम्बाइन हार्वेस्टर ः या प्रकारच्या हार्वेस्टरमध्ये स्वतःचे एक वेगळे इंजिन बसवलेले असून, त्याद्वारे हार्वेस्टरमधील सर्व यंत्रणांना ऊर्जा पुरवली जाते.
क) ट्रॅक टाइप कम्बाइन हार्वेस्टर्स ः यात चाकांऐवजी ट्रॅक बसवलेले असतात. ही उच्च ग्राउंड क्लीअरन्स, टिकाऊ ड्रायव्हर्स, हेवी-ड्यूटी चॅसिस आणि पंप असलेली एक टिकाऊ रचना आहे. चाकांवर आधारित हार्वेस्टर चालू न शकणाऱ्या, पाणथळ किंवा अत्यंत चढ-उताराच्या शेतांमध्येही ते उपयुक्त ठरतात. विशेषतः भातासारख्या पिकामध्ये अनेक वेळा शेवटपर्यंत पाणी असू शकते, अशा ठिकाणी ट्रॅक टाइप कम्बाइन हार्वेस्टर उपयोगी ठरतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.