Bull-driven three-pass fertilizer Hoe Agrowon
टेक्नोवन

बैलचलित तीन पासेचे खत कोळपे

तीन पासेचे खत कोळपे यंत्राचा वापर करुन वेळेत आणि खर्चातही बचत होते.

Team Agrowon

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. पण काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उघडीप आहे. त्यामुळे तिथे शेतात कोळपणी आणि इतर आंतरमशागतीच्या कामाची लगबग सुरू आहे. शेतीकामांसाठी मजूर मिळत नाहीत. शेतकऱ्यांपुढे सध्या ही सगळ्यात मोठी समस्या आहे. त्यामुळे कामं कशी उरकायची, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी बैलचलित तीन पासेचे खत कोळपे उपयुक्त आहे. या यंत्राचा वापर करुन वेळेत आणि खर्चातही बचत होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने बैलचलित तीन पासेचे खत कोळपे विकसित केले आहे. पिकातील आंतरमशागतीसाठी आणि खत देण्यासाठी ते उपयुक्त आहे. एका मजुराच्या सहाय्याने तीन ओळीतील आंतरमशागतीचे खत देण्याचे काम एकाच वेळी या यंत्राद्वारे करता येते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत या कोळप्यामुळे वेळेत आणि खर्चात ३० ते ४० टक्के बचत होते. कमी मजूर लागतात. सर्व पिकांतील आंतरमशागतीसाठी आणि खत देण्यासाठी हे कोळपे उपयुक्त आहे.

यंत्राची वैशिष्ट्ये कोणती ?


य़ंत्राची रुंदी ः १ मिटर
कोळपणीची खोली ः ५ सेंमी
कामाचा वेग ः २.२५ ते २.५० किमी प्रति तास
ओढशक्ती ः २२ ते ५५ किलो.
कार्यक्षमता ः ०. १९ हेक्टर प्रति तास

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT