Artificial Intelligence Technology Agrowon
टेक्नोवन

Agriculture AI Technology : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल

‘‘कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे.’’

Team Agrowon

परभणी ः ‘‘कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानासह आधुनिक शेतीसाठी (Modern Agriculture) शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (Artificial Intelligence Technology) आत्मसात करावे लागेल,’’ असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी केले.

परभणी कृषी विज्ञान केंद्रातर्फे कृषी महोत्सवानिमित्त ‘कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर शुक्रवारी (ता.१३) शेतकरी मेळावा घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई देशमुख होत्या. केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. प्रशांत भोसले, खेती बड्डीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अश्विनी मोताफळे, आकाश चव्हाण, अभिषेक काटकर, श्रीधर पवार, शरद ठमके आदींची उपस्थिती होती.

डॉ. भोसले म्हणाले, ‘‘कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे.’’

डॉ. मोताफळे यांनी प्रकल्पाची, तर चव्हाण यांनी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, रिमोट सेन्सिंगव्दारे पिकांच्या नियोजनावर माहिती दिली.

शेतीमध्ये विविध आव्हाने स्वीकारण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) व्दारे जमिनीमध्ये पाणी, अन्नद्रव्यांची कमतरता, कीड रोगांची ओळख यासह विविध समस्यांचे आकलन होते, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Prices: सोयाबीन ठरणार ‘गोल्डन बीन’

India Rice Export: ‘यूएसडीए’ने घटवला भारतीय तांदूळ निर्यातीचा अंदाज

Global Economy: जागतिक विकासदर घटण्याचा अंदाज

Delhi Protest Restrictions: पोलिस दिल्लीचे आणि मुंबईचे...

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

SCROLL FOR NEXT