झेंड्याद्वारे मिळवता येईल ऊर्जा 
झेंड्याद्वारे मिळवता येईल ऊर्जा  
टेक्नोवन

झेंड्याद्वारे मिळवता येईल ऊर्जा 

वृत्तसेवा

वाऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्यांनी आजवर अनेकांना प्रेरणा दिली आहे. आता हेच झेंडे फडकण्याच्या आपल्या कृतीतून वारा आणि सूर्यप्रकाशाच्या साह्याने विद्युत ऊर्जानिर्मिती करू शकतील, असे तंत्रज्ञान मॅंचेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. या पवन आणि सौरऊर्जा मिळवणाऱ्या झेंड्यांच्या निर्मितीसाठी खास लवचिक अशा पिएझोइलेक्ट्रिक पट्ट्या आणि फोटो व्होल्टाईक सेलचा वापर केला आहे. हे संशोधन ‘जर्नल ॲप्लाईड एनर्जी’मध्ये प्रकाशित केले आहे.  नव्याने विकसित केलेल्या या झेंड्याद्वारे लहान आकाराचे सेन्सर, इलेक्ट्रॉनिक उपकरणांना ऊर्जा पुरवणे शक्य होणार आहे. विशेषतः पर्यावरणातील प्रदूषण, आवाजाची पातळी, उष्णता अशा विविध घटकांचे मापन करणारे सेन्सरला ऊर्जा पुरवता येईल. स्वस्त, शाश्वत ऊर्जा पुरवणाऱ्या आणि त्याच वेळी किमान देखभालीची गरज असलेल्या घटकांच्या शोधाचे उद्दिष्ट मॅंचेस्टर विद्यापीठातील जॉर्ज सिल्वा लियोन यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्या म्हणाल्या, की वारा वाहत असताना झेंडा या बाजूपासून त्या बाजूपर्यंत फडकत राहतो. याला लिमिट सायकल ऑस्सिलेशन्स असे म्हणतात. या हालचालीमुळे त्यातील पिएझोइलेक्ट्रिक घटकही हलत राहतात. या सोबतच त्यावरील सोलर पॅनेल असल्यामुळे त्याद्वारेही विजेची उपलब्धता होऊ शकते.  डॉ. ॲन्डेया सियानकोलिनी यांनी सांगितले, की पवन आणि सौर ऊर्जा या दोन्ही ऊर्जा एकमेकांना पुरक ठरतात. वादळी वाऱ्याच्या काळामध्ये सूर्यप्रकाशाची कमतरता असते. तर एखाद्या प्रखर सूर्यप्रकाशाच्या दिवशी वारे अत्यंत शांत असू शकते. संशोधकांच्या गटाने आपल्या झेंड्यांचे कामकाज व कार्यक्षमता मोजण्यासाठी खास वेगवान व्हिडिओ प्रतिमांकनाचे व वस्तूंच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या खास ट्रॅकिंगचे तंत्रज्ञान वापरले आहे. वारे शांत असताना (० मीटर प्रति सेकंद) ते वादळी वाऱ्याच्या स्थितीमध्ये (२६ मीटर प्रतिसेकंद) आणि १.८ किलोलक्स इतक्या तीव्रतेच्या प्रकाशामध्ये या झेंड्याच्या चाचण्या घेतल्या आहे. त्यातून ३-४ मिली वॅट इतकी ऊर्जा तयार होत असल्याचे आढळले आहे. या ऊर्जेवर कमी क्षमतेचे सेन्सर चालवणे शक्य होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT