Jaggery production technology
देशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानाने उसाचा रस काढण्यापासून ते गुळाची पावडर तयार होईपर्यंत सर्व प्रक्रिया ही स्वयंचलित पद्धतीने म्हणजे मनुष्य स्पर्श न होता बंदिस्त पद्धतीने केली जाते.
या तंत्रज्ञानामध्ये उसाचा रस स्वच्छ करण्यासाठी कोणतेही रसायन म्हणजे अगदी भेंडी पावडर सुद्धा मिसळावी लागत नाही. केवळ ३ ते ४ माणसे हा प्रकल्प व्यवस्थित हाताळू शकतात. संपूर्णपणे स्टेनलेस स्टील-३०४ मध्ये ही यंत्रणा बनविलेली आहे. या तंत्रज्ञानाला पेटंट देखील मिळाले आहे.
असा आहे स्वयंचलित गूळ उत्पादन प्रकल्प
आधुनिक तंत्रज्ञानात उसाचा रस आटविण्यासाठी वाफेचा अतिशय योग्य पद्धतीने वापर केला आहे. प्रतिदिन १०, ३० व ५० टनांपर्यंत ऊस गाळप क्षमता असलेल्या प्रकल्पाला नॉन आयबीआर स्टीम बॉयलर लागतो. यासाठी सर्टिफाईड बॉयलर अटेण्डंट ठेवण्याची आवश्यकता नाही. प्रतिदिन १०, ३०, ५० ते ५०० टनांपर्यंत ऊस गाळप क्षमता असलेला प्रकल्प कारखान्यातच वायरिंग, पायपिंग व इनसुलेशन करून, लोखंडी चौकटीवर जोडून, वापरण्यास तयार करता येतो. सुधारित तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केल्याने दैनंदिन व्यवस्थापनात फारशा अडचणी येत नाहीत. या तंत्रज्ञान भारतीय पेटंट मिळालेले आहे. भारत सरकार आणि अनेक आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेल्या गुळाचा दर्जा
आधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेला गूळ हा पावडर स्वरूपात असून आय.एस.१२९२३ मानंकानाप्रमाणे सातत्याने ग्रेड १ पेक्षाही उत्तम दर्जाचा तयार होतो. गूळ पावडरमध्ये पाण्याचे प्रमाण १.५ टक्यांपेक्षा कमी असते. त्यामुळे पावडर एकदम कोरडी, फ्री फ्लोइंग आणि वापरायला सोपी जाते. पावडर ३० महिन्यांपर्यंत टिकते. मानवी स्पर्शाशिवाय पावडर तयार झाली असल्याने स्वच्छ व जंतू विरहित असते. त्यामुळे साखरेस पर्यायी व अधिक आरोग्यदायी घटक म्हणून स्वीकारली जाते. बाजारपेठेमध्ये पारंपरिक गुळापेक्षा जास्त किंमत मिळू शकते.उत्तम गुणवत्तेमुळे ही गूळ पावडर प्रगत देशांत निर्यात होऊ शकते. कसा ओळखावा शुद्ध, आरोग्यदायी गूळ
गूळ खरेदी करताना पॅकेजिंगवरील माहिती तपासून घ्यावी. उत्पादक व विक्रेता कंपनीचे नाव, पत्ता, एफ.एस.एस.ए.आय. प्रमाणपत्र नंबर. आरोग्यदायी घटकांचे प्रमाण. आय.एस. १२९२३ प्रमाणे योग्य असल्याचे आणि तसे नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर लॅबोरेटरीजद्वारे प्रमाणित प्रयोगशाळेने खात्री केल्याचे उत्पादकाचे प्रमाणपत्र. उत्पादनाची तारीख, टिकवणक्षमता कालावधी.लॉट नंबर. सेंद्रिय गूळ असल्यास त्याचे प्रमाण म्हणून युएसडीए ऑरगॅनिक, इंडिया ऑरगॅनिकचा वैध शिक्का,बार कोड.पॅकेजिंगचे मटेरीअल आणि दर्जा Email: info@tftindia.com ( लेखक अभियांत्रिकी विषयातील तज्ज्ञ आहेत)