वनस्पतींचे भौगोलिक मूळ ठरवणे होईल सोपे
वनस्पतींचे भौगोलिक मूळ ठरवणे होईल सोपे 
टेक्नोवन

वनस्पतींचे भौगोलिक मूळ ठरवणे होईल सोपे

टीम अॅग्रोवन

विविध पिके किंवा अन्नधान्य उत्पादनामध्ये भौगोलिक मानांकन, एकाद्या पिकाचे मूळ स्थान याला प्रचंड महत्त्व दिले जाते. त्यावर जगभरामध्ये मोठा व्यवसाय आधारलेला आहे. मात्र यात अनेकजण खोटे दावे करून मूळ उत्पादनांना आर्थिक नुकसान पोहोचवू शकतात. हे टाळण्यासाठी बॅसेल विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञांनी पीक किंवा अन्नधान्यांचे मूळ ठरवण्यासाठी अत्यंत कार्यक्षम आणि स्वस्त असे प्रारूप विकसित केले आहे. हे संशोधन ‘सायंटिफिक रिपोर्टस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. स्वित्झर्लंडची स्ट्रॉबेरी, इटली येथील ऑलिव्ह ऑइल अशा अनेक पिकांची किंवा पदार्थांची ओळख त्यांच्या मूळ स्थानाशी जोडलेली असते. येथील उत्पादनांना जगभराचे दर्दी ग्राहक अधिक किंमतही मोजत असतात. मात्र अशीच पिके सर्वत्र कमी अधिक प्रमाणात तयार होत असतात. तीही एकाच वेळी बाजारात येत असतात. व्यापाऱ्यांकडून किंवा उत्पादकांकडून आपले उत्पादन हे वेगळ्याच ठिकाणचे असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यातून मूळ उत्पादकांनाही अप्रत्यक्षपणे आर्थिक फटका बसत असतो. अशा प्रकारे भौगोलिक मानांकन किंवा मूळ स्थानाच्या खोट्या दाव्यातून दरवर्षी सुमारे ३० दशलक्ष ते ४० अब्ज डॉलरपर्यंतचे आर्थिक नुकसान होत असते. फसवणूक ओळखण्याची जुनी पद्धत ः अन्नपदार्थांतील ही फसवणूक ओळखण्याची एका पद्धतीमध्ये पदार्थातील ऑक्सिजन आयसोटोप गुणोत्तराचे मूल्यांकन करणे. यालाच शास्त्रीय भाषेत δ१८O (delta-O-१८) या नावाने ओळखले जाते. आतापर्यंत ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि महाग होती. या प्रत्येक फसवणुकीच्या घटनेमधील पदार्थांनी संबंधित त्यांच्या मूळ देशातून सर्व संदर्भ माहिती साठा मिळवावा लागे. त्याचे अन्य प्रदेशातील त्याच उत्पादनाशी तुलना करून फरक समजून घ्यावा लागे. त्यानंतरच तो पदार्थ खरोखरच मूळ प्रदेशातील आहे किंवा नाही, याची शहानिशा करता येई. खर्च कमी करणारे नवे प्रारूप ः बॅसेल विद्यापीठातील वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. फ्लोरियन क्युनी यांनी अॅग्रोसोलॅब जीएमबीएच या आयसोटोप विश्‍लेषणामध्ये प्रावीण्य असलेल्या कंपनीसोबत नवे प्रारूप विकसित केले आहे. त्यात त्या मूळ प्रदेशातील वनस्पतीचे ऑक्सिजन आयसोटोप गुणोत्तराची अभ्यासासाठी प्रतिकृती (सिम्युलेशन) तयार केली जाते. हे प्रारूप पीक हंगामातील तापमान, पर्जन्यमान आणि आर्द्रता यांच्या माहिती साठ्यावर आधारित आहे. यातील बहुतांश बाबी या सार्वजनिकरित्या सहज उपलब्ध होऊ शकतात. क्युनी यांनी गेल्या अकरा वर्षापासून स्ट्रॉबेरीच्या युरोपातील विविध देशांतून वैशिष्ट्यपूर्ण δ१८O संदर्भ माहिती साठा गोळा केला आहे. त्याच्याशी तुलना करून आपले प्रारूपाच्या चाचण्या केल्या असून, ते प्रमाणित केले आहे. या स्ट्रॉबेरीच्या केस स्टडीमध्ये उच्च प्रतीची अचूकता मिळाली आहे. उपयुक्तता ः

  • या संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या प्रो. अॅंसगर काहमेन यांनी दिलेल्या माहितीनुसार,
  • निकषांमध्ये थोड्याशा बदलानंतर हे प्रारूप अन्य अनेक वनस्पतींसाठी वापरणे
  • शक्य आहे. या प्रारूपामुळे पारंपरिक आयसोटोप विश्लेषण पद्धती अधिक वेगवान आणि सोपी होणार आहे.
  • विविध गुन्ह्यांमध्ये गुन्हेशाखांद्वारे केल्या जाणाऱ्या अन्नाच्या विश्‍लेषणासाठीही ही पद्धत वापरता येईल.
  • वनस्पतींप्रमाणे लाकडाच्या ओंडक्यांचे मूळ स्थानही मिळवणे शक्य आहेत. हे तंत्र विविध स्वयंसेवी संस्था उदा. ग्रीन पीस आणि वर्ल्ड वाइल्ड फेडरेशन यांनाही फायद्याचे ठरू शकते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT