इलिव्हेटेड कार्ट आवश्‍यकतेनुसार कमी अधिक उंच करता येते.
इलिव्हेटेड कार्ट आवश्‍यकतेनुसार कमी अधिक उंच करता येते.  
टेक्नोवन

चेरी टोमॅटोच्या काढणीसाठी ‘इलेव्हेटेड कार्ट’

कोजेन्सिस वृत्तसेवा

अधिक उंचीपर्यंत वाढणाऱ्या वेली किंवा फळझाडांमध्ये व्यवस्थापन, छाटणी व काढणी यासारख्या नित्य कामांमध्ये अडचणी येतात. पर्यायाने कामाचा वेग कमी होऊन अधिक मनुष्यबळ लागते. हे टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार उंच होणारी ढकलगाडी (इलेव्हेटेड कार्ट) उपयुक्त ठरू शकते.

परदेशामध्ये हरितगृहामध्ये चेरी टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात होते. ही वेल उंच वाढते. त्यावर पाने व फळे काढण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत. त्याच प्रमाणे नेदरलॅंड येथील संशोधन संस्थेतील बियाणे पैदासकारांनाही टोमॅटोच्या व्यवस्थापनामध्ये अडचणी येत. खास या पैदासकारांना पाने काढणे सोयीचे व्हावे, यासाठी सुरवातीला स्टिंक्स सर्व्हिसेस या कंपनीतर्फे उंच होणाऱ्या ढकलगाडीची निर्मिती करण्यात आली. त्याविषयी माहिती देताना निर्माते स्टिंक्स सर्व्हिसेसचे वॉऊटर स्टिंक्स म्हणाले की, शेतीमध्ये शेतीमालाची काढणी आणि वाहतूक करताना त्यातील खराब रस्त्यामुळे किंवा खाचखळग्यामुळे वाहन चालवता अडचणी येतात. त्याच प्रमाणे उंची वाढवल्यानंतर कार्ट कलंडण्याचाही धोका असतो. हा टाळण्यासाठी यामध्ये खास उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे टोमॅटोमधील पाने काढण्याच्या कामाचा वेग वाढतो. एक वर्षापूर्वी संपूर्ण चाचण्यानंतर पाने काढण्याची कार्ट बाजारात आणण्यात आली. अशाच प्रकारे गुलाबाच्या काढणीसाठीही एक ट्रॉली तयार करण्यात आली आहे. लांब दांड्याची फुले अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याची व ठेवण्याची सोय आहे.

वेबसाईट ः www.steenks-service.nl वैशिष्ट्ये

  • ही ढकलगाडी आकाराने लहान असून, दोन ओळीमधून व्यवस्थित जाऊ शकते.
  • कार्टची गतीशीलता उत्तम असून, ड्रायव्हिंगही सुलभतेने करता येते.
  • सुरक्षिततेच्या दृष्टीने या कार्टला रेलिंग असले तरी आवश्यकतेनुसार ते खाली करता येते. त्यामुळे कोणत्याही कामासाठी वापरता येते.
  • या कार्टमध्ये प्लॅटफॉर्मची उंची साध्या तंत्राने आवश्यकतेनुसार वर खाली करता येते. त्यासाठी त्यात एक कंट्रोल पॅनेल असून, बॅटकी चार्जरही देण्यात आला आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT