Farm Pond Agrowon
शासन निर्णय

शेततळे अस्तरीकरणास ७५ हजारापर्यंत अनुदान

अस्तरीकरणामुळे शेतातील तळ्यात पाण्याचा सुरक्षित साठा उपलब्ध होतो. साठवलेले पाणी झिरपून जाऊ नये, तसेच टंचाईच्या काळात फळबागा वाचविण्यासाठी या पाण्याचा वापर होण्यासाठी अस्तरीकरणाला ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा प्रस्ताव होता.

अॅग्रोवन वृत्तसेवा

पुणेः राज्यात पाणीटंचाईच्या काळात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शेततळ्यांच्या (Farm Pond) अस्तरीकरणासाठी यंदा ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून वैयक्तिक शेततळ्याच्या अस्तरीकरणाला अनुदान दिले जाईल. अस्तरीकरणामुळे शेतातील तळ्यात पाण्याचा सुरक्षित साठा उपलब्ध होतो. साठवलेले पाणी झिरपून जाऊ नये, तसेच टंचाईच्या काळात फळबागा वाचविण्यासाठी या पाण्याचा वापर होण्यासाठी अस्तरीकरणाला ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार २८ हजारांपासून ते ७५ हजार रुपयांपर्यंत तळ्याच्या आकारानुसार अस्तरीकरणाला अनुदान मिळेल.

१५ × १५ × ३ मीटरच्या अस्तरीकरणासाठी २८,२७५ रुपये, तर २० × १५ × ३ मीटरसाठी ३१,५९८ रुपये, २० × २० × ३ मीटरसाठी ४१,२१८ रुपये, २५ × २० × ३ मीटरसाठी ४९,६७१ रुपये, २५ × २५ × ३ मीटरसाठी ५८,७०० रुपये, ३० × २५ × ३ मीटरसाठी ६७,७२८ रुपये, तर ३० × ३० × ३ मीटरच्या अस्तरीकरणाला ७५ हजार रुपयांचे अनुदान मिळेल.

सामूहिक शेततळ्यासाठी मात्र १०० टक्के अनुदान मिळेल. ३४ × ३४ × ४.७० मीटर आकारमान असलेल्या सामूहिक शेततळ्यावर जर दोन ते ५ हेक्टरपर्यंत किंवा त्यापेक्षा जादा फलोत्पादन क्षेत्र असल्यास त्यासाठी तीन लाख ३९ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. मात्र फलोत्पादन क्षेत्र एक ते दोन हेक्टरच्या दरम्यान असल्यास २४ × २४ × ४ मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी पावणेदोन लाख रुपये अनुदान मिळेल.

...इथे करा अर्ज

या योजनांचा लाभ घेण्यासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात. योजनांबाबत माहिती हवी असल्यास कोणत्याही कृषी सहायक, पर्यवेक्षक किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क करता येईल, असे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले.

स्वखर्चाने किंवा शासकीय योजनेतून अशा दोन्ही बाबींमधून शेततळे खोदाई करणारे शेतकरी अस्तरीकरणाच्या अनुदानासाठी पात्र असतील. तळ्याच्या आकारानुसार अनुदानाची रक्कम थेट बॅंक खात्यात वर्ग होईल.
- डॉ. कैलास मोते, संचालक, फलोत्पादन विभाग, कृषी आयुक्तालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT