सोलापूर ः (Solapur) वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात (Animal Attack) मनुष्यहानी झाल्यास अथवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे पशुधन मृत, अपंग अथवा जखमी झाल्यास अर्थसाहाय्याची रक्कम अदा करण्याची तरतूद आहे. वन्यप्राण्यांच्या हल्लाप्रकरणी आर्थिक परवड लक्षात घेऊन अर्थसाहाय्य आणि नुकसान भरपाईत नुकतीच शासनाने वाढ केली आहे.
पशुसंवर्धन विभागाने यासंबंधी नव्या निर्णयाची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना यापुढे २० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. व्यक्ती कायमस्वरूपी अपंग झाल्यास पाच लाख रुपये,
तर गंभीर जखमी झाल्यास सव्वा लाख रुपये देण्यात येणार आहेत. पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कमही शासनाने वाढवली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यास रुपये २० लाख पैकी २० लाख रुपये देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम दहा लाख
त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम जमा करण्यात येईल. रुपये दहा लाखांपैकी रुपये पाच लाख पाच वर्षांकरिता ठेव रकमेमध्ये तर उर्वरित रुपये पाच लाख १० वर्षांकरिता फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील.
दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल. तसेच व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येईल. मात्र खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक असल्यास रकमेची मर्यादा रुपये २० हजार प्रती व्यक्ती अशी आहे, असे सांगण्यात आले.
पशुधनासाठी नुकसान भरपाई
गाय, म्हैस व बैल यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ७० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम देय होईल. मेंढी, बकरी व इतर पशुधनांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजार यापैकी कमी असणारी रक्कम मिळेल. गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजार भाव किमतीच्या ५० टक्के किंवा १५ हजार देण्यात येतील, असेही सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.