Namo Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Namo Scheme : अडीच लाख शेतकऱ्यांना मिळणार सहा हजार रुपये

State Government : राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

Team Agrowon

Amravati News : राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तीन हप्त्यात निधी मिळणार असून, दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ देण्याची योजना आहे. त्याच वेळी ६५ हजार शेतकरी वंचित राहणार आहेत.

२०१९ मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. प्रती महिना पाचशे रुपये शेतकऱ्यांना देणारी ही योजना असून, दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतराद्वारे जमा करण्यात येतात.

या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिल्या जातात. यात धर्तीवर राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील २ लाख ४३ हजार ७५२ शेतकऱ्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ई-केवायसी व बँक खाते आधार लिंक केले आहे त्यांना या महिन्यात केंद्राच्या योजनेच्या १४ व्या हप्त्यासह राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रक्रिया पूर्म करण्याचे आवाहन

केंद्र सरकारच्या योजनेतील सहा हजार व राज्य सरकारच्या योजनेतील सहा हजार असे बारा हजार रुपये वर्षाकाठी मिळणार आहेत. त्यासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी ती तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT