UPSC Exam Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी ‘बार्टी’चे मार्फत ३०० विद्यार्थांना प्रशिक्षण

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार निर्णय

टीम ॲग्रोवन

पुणे ः सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) (BARTI) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वतयारीसाठी (UPSC Preparation) दिल्ली येथे अनुसूचित जातीतील २०० विद्यार्थ्यांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, यावर्षीपासून (२०२२-२३) ३०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी घेतला आहे.

‘बार्टी’मार्फत विशेष चाचणी परीक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे. दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेस देण्यात येणारे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क, विद्यार्थ्यांना उपस्थितीनुसार विद्यावेतन दरमहा २ हजार रुपये दिले जाते. याशिवाय पहिल्या महिन्यातील आर्थिक साहाय्य ३ हजार रुपये आणि सुरुवातीच्या दिल्ली येथील प्रवासाकरिता ५ हजार रुपये व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रक्कम रुपये ५ हजार प्रवास भत्ता विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

मागील दोन वर्षांत कोरोना संकटामुळे उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन प्रशिक्षण पद्धतीला आत्मसात करत ‘बार्टी’मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले होते. ‘बार्टी’चे २०२० मध्ये ९, तर २०२१ मध्ये ७ उमेदवार यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ‘बार्टी’च्या https://barti.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन ‘बार्टी’चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation : काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Agriculture Technology: पीक अवशेषातून हरित ऊर्जा निर्मितीचे कार्बन-निगेटिव्ह तंत्रज्ञान

E-Pik Pahani: शेतकऱ्यांना थेट बांधावर ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक

Shetkari Bhavan: पंचेचाळीस शेतकरी भवन बांधण्यास मान्यता

Buldhana Heavy Rain: जोरदार पावसाने सिंदखेडराजा तालुक्यात पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT