Free Trade Agreement: मुक्त व्यापार करारात शेती, डेअरीला संरक्षण
India New Zealand FTA: न्यूझीलंडने भारताच्या कापड, तयार कपडे, चर्मोद्योग आणि सागरी उत्पादनांसह इतर वस्तुंच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. तर भारताने वाईन, अवोकॅडो, ब्लूबेरीज आयातीवरील शुल्क कमी केले असून मध, सफरचंद, किवीच्या शुल्कमुक्त आयातीचा कोटा ठरवून दिला आहे.