Drought Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

‘महामदत’ पोर्टल आणि ॲपला तीन वर्षांची मुदतवाढ

दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठी विकसित प्रणाली

टीम ॲग्रोवन

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘महामदत’ या ॲप आणि पोर्टला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठी जी प्रकिया विकसित करण्यात आली आहे. त्यात मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली होती.

राज्यातील दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने २०१६ मध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता तयार केली आहे. यात दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठी अनिवार्य आणि प्रभावदर्शक निर्देशांक निश्चित केले आहेत. शास्त्रीय पद्धतीने करण्यात येणाऱ्या या मूल्यांकनात मानवी हस्तक्षेप कमी राहावा आणि चुका टाळाव्यात यासाठी नागपूर येथील महाराष्ट्र रिमोट सेटिंग्ज ॲप्लिकेशन सेंटरच्या सहकार्याने महामदत हे ॲप आणि पोर्टल विकसित करण्यात आले होते. सरकारशी या संस्थेने २०१८ मध्ये सामंजस्य करार केला होता. या प्रणालीची मुदत २०२१ च्या रब्बी हंगामापर्यंत होती. यापुढील कामकाजासाठी या कंपनीला मुदतवाढ मिळते की अन्य कंपनी नवे पोर्टल आणि अॅप विकसित करते याकडे लक्ष लागले होते. नुकत्याच झालेल्या विभागीय प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

या प्रणालीत गरजेनुसार अद्ययावतीकरण करण्याची अट घालण्यात आली असून यंदाच्या खरीप हंगामापासून पुढील तीन वर्षे ही प्रणाली सुरू ठेवण्यात येणार आहे. यासाठी प्रतिवर्षी २२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार यंदा आणि २०२३-२४ या खरीप हंगामातील दुष्काळाचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. ही कार्यवाही पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीस प्रतिवर्षी २२ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: यवतमाळ, वाशिम, सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी ८५ कोटी निधी मंजूर

Village Self Reliance: ग्राम स्वावलंबन, अर्थात गावातील पैसा गावातच

Environmental Development: वाट पर्यावरणपूरक विकासाची!

Farmer Issue: शेतकऱ्यांचे जातधर्मविरहित संघटन हे आशावादी चित्र

CM Devendra Fadnavis: आधुनिक उत्पादन क्षेत्रासाठी ‘राज्य अभियान’ राबविणार

SCROLL FOR NEXT