Climate-Smart Agriculture: काळानुरूप बदलती हरित कौशल्ये आत्मसात करण्यामध्ये भारतीय तरुणाई मागे पडली, तर याचा अर्थकारणाला मोठा फटका बसू शकतो, असे ‘युनिसेफ’च्या अहवालातून पुढे आले आहे. आज आपण तरुणांचा देश म्हणून सर्वत्र शेखी मिरवतोय. परंतु तरुणांच्या देशात बहुतांश जणांच्या हाताला काम नाही. शेतीत काम करायला तरुणाई तयार नाही. त्यामुळे शेतीसह निर्मिती तसेच सेवा क्षेत्राची वाढही ठप्प झाली आहे. .बहुतांश तरुणांमध्ये व्यावसायिक शिक्षण आणि त्यामुळेच कौशल्याच्या अभावाने बेरोजगारीच्या सर्वोच्च पातळीवर आपण आहोत. आज मोठ्या संख्येने तरुण असलेला वर्ग हळूहळू वृद्ध देखील होईल. त्या वेळी मोठ्या संखेने वृद्धांच्या लोकसंख्येचा भार अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. विशेष म्हणजे आता शेतीसह उद्योग, सेवा क्षेत्र झपाट्याने बदलत आहे..बदलत्या हवामान काळात भविष्यात ‘क्लायमेट स्मार्ट’ शेती करावी लागेल. उद्योग-व्यवसाय, सेवा क्षेत्रातही बदलास पूरक ‘स्टार्ट अप’ विकसित करावे लागतील. अशा बदलत्या व्यवस्थेत ग्रामीण तसेच शहरी भागांतून हरित कौशल्याची मागणी वाढणार आहे. गंभीर बाब म्हणजे १८ ते २९ वर्षे वयोगटातील केवळ ३७ टक्के तरुणांनाच हरित रोजगाराबाबत माहीत आहे..Environment Conservation : हिवरेबाजारचे पर्यावरण संवर्धनाचे काम प्रेरणादायी.आपल्याला सध्या विनाशकारी विकासच माहीत आहे. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून, नदी, वन-जंगल क्षेत्रावर अतिक्रमणे करून रस्ते बांधणे, खाणकाम करणे, उद्योग-पर्यटन विकास करण्याचा सपाटा सुरू आहे. शेतीतही कमी क्षेत्रातून अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खते, कीडनाशकांचा अनियंत्रित वापर वाढला आहे. त्याचे दुष्परिणामही माती-पाणी-अन्न प्रदूषणासह मानवी आरोग्यावर होत आहेत..Environment Conservation : पर्यावरण संवर्धनामध्ये मधमाशी मोलाची....त्यामुळे सर्वच क्षेत्रात पर्यावरणपूरक विकासावर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला आधी तरुणांमध्ये हरित कौशल्य विकसित करावी लागतील. हरित कौशल्य म्हणजे पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य! मुंबई, दिल्लीसह देशाच्या इतरही मोठ्या शहरांतून पुढील तीन वर्षांत ४० टक्के हरित रोजगार निर्माण होतील..अशा वेळी शहरांतून हरित आराखडा असलेल्या इमारती, पाण्याचा योग्य विनियोग करणारी यंत्रणा आणि कमी कार्बन उत्सर्जन करणारे घटक आदी संबंधीचे रोजगार वाढतील. शेतीत हिरव्या कौशल्यामध्ये सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, जलसंवर्धन, पीक अवशेषांची योग्य विल्हेवाट अथवा त्यांना जागीच कुजविणे, अक्षय ऊर्जेचा वापर, जैवविविधता जपणे, रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर कमी करीत असताना उत्पादनात सातत्य ठेवणे यासारख्या कौशल्यांचा समावेश होतो..२०२२ ते २३ या कालखंडात किमान एक पर्यावरणपूरक कौशल्य आवश्यक असणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण २२.४ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र ही कौशल्ये प्राप्त असलेल्या कामगारांच्या संखेत केवळ १२.३ टक्क्यांनीच वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांत ही तफावत अजून वाढली आहे. केंद्र सरकारने हरित कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतला असून याद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे. परंतु एवढे पुरेसे नाही..हरित कौशल्ये बालवयापासून विकसित करावी लागतील. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमांतूनच ती शिकविली जायला हवीत. ग्रामीण तसेच शहरी भागांतून हरित कौशल्ये विकसित करणारी केंद्रे उघडावी लागतील. त्यातून शेतकरी, तरुणांना हरित कौशल्याबाबत जागृत करावे लागेल. प्रशिक्षण कार्यक्रमही घ्यावे लागतील. असे झाले तरच भविष्यात गरजेनुसार हरित कौशल्ये विकसित होऊन त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील. पर्यावरणपूरक शाश्वत विकासासाठी हे गरजेचे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.