Agriculture Subsidy Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Incentive Subsidy : तेरा हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

अमरावती जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या ३२ हजार ४८६ शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाकडून शासनाला पाठविण्यात आली आहे.

Team Agrowon

अमरावती : नियमित पीककर्ज (Crop Loan) भरणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान (Farmer Incentive Subsidy) देण्याची सरकारच्या घोषणेची पूर्तता अद्याप झालेली नाही.

अनुदान (Agriculture Subsidy) जाहीर झाले असले तरी आचारसंहितेच्या नावाखाली रोखण्यात आलेली दुसरी यादी जाहीर न झाल्याने १३ हजार ६७३ शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम असून त्यांच्यात अस्वस्थता आहे.

अमरावती जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या ३२ हजार ४८६ शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाकडून शासनाला पाठविण्यात आली आहे.

त्यापैकी १८ हजार ८१३ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली. त्यातील ४४६८ शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणींचा निपटारा व्हायचा आहे.

त्यामुळे १४ हजार ३४५ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदान जमा होणार होते. मात्र यादी जाहीर झाली. त्यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण समोर करून दुसरी यादी रोखून त्यांचे अनुदान रोखण्यात आले.

आता निवडणुका आटोपल्या असल्या तरी यादी जाहीर झालेली नाही. ६५ कोटी १० लाख रुपये इतके अनुदान पहिल्या यादीतील शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केले आहे.

दुसऱ्या यादीत १३ हजार ६७३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही यादी अद्याप जाहीर झालेली नाही. ग्रामपंचायतीची आचारसंहिता संपुष्टात आली असतानाही यादी जाहीर होत नसल्याने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुसऱ्या यादीबद्दल संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.

जिल्ह्यातील प्रोत्साहन अनुदानाची स्थिती

एकूण कर्जदार - ३२,४८६

पहिल्या यादीत समाविष्ट - १८,८१३

प्रत्यक्ष अनुदानप्राप्त शेतकरी - १४,३१५

प्रतीक्षेतील दुसरी यादी - १३,६७३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT