Solar Pump Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या दुसऱ्या टप्प्याला आजऱ्यात सुरुवात

Government Scheme : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. सौर प्रकल्प उभारणीसाठी पडीक, गायरान, खासगी जमिनी शासनाकडून भाडेतत्त्वावर घेतल्या जात आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. सौर प्रकल्प उभारणीसाठी पडीक, गायरान, खासगी जमिनी शासनाकडून भाडेतत्त्वावर घेतल्या जात आहेत.

आजरा तालुक्यातही याला प्रतिसाद मिळत असून हरपवडे ग्रामपंचायत व आजऱ्यातील एका शेतकऱ्याने प्रकल्प उभारणीसाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. राज्य शासनाने सकारात्मक पाऊल टाकले असून या प्रकल्पामधून तयार होणारी वीज स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिली जाणार असून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सध्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यामध्ये सौर प्रकल्प उभारणीसाठी शासनाने पडीक जमिनी, गायरान जमिनी व खासगी जमिनीला प्राधान्य दिले आहे.

जमिनी उपलब्ध झाल्यास एकरी वार्षिक पन्नास हजार रुपये भाडे स्वरूपात शेतकऱ्याला दिले जाणार आहेत. गायरान जमिनीला पहिली तीन वर्षे प्रत्येकी पाच लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे.

वीज उपकेंद्रापासून दहा किमीच्या आत जमीन किंवा गायरान असले पाहिजेत. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हरपवडे ग्रामपंचायतीने गायरान जमीन व आजऱ्यातील शेतकरी विनय सबनीस यांनी खासगी जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे.

आजऱ्यात उतूर, गवसे यासह विविध गावांत अधिकाऱ्यांनी थेट संपर्क करीत जमीन उपलब्ध करून देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना केले. असे प्रकल्प उभारले तर शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी दिवसा वीज उपलब्ध होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Dudh Sangh: 'गोकुळ'वरून राजकीय वादाची ठिणगी; दूध संघावर प्रशासक की निवडणूक, नेमकं काय ठरलं?

MahaDBT Schemes: ‘महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावेत’

Paneer Adulteration: भेसळीवर कारवाई

Farmer Issues: डोक्यावर बर्फ अन् जिभेवर साखर ठेवून बोला : आमदार पवार

Turmeric Farming: हळद लागवडीत योग्य कंद निवड आणि बीजप्रक्रिया कशी करावी?

SCROLL FOR NEXT