Water Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

घराघरात नळ पाणीपुरवठा योजना पोहोचवणार ः दत्ता भरणे

बळपुडी (ता. इंदापूर) येथे भरणे यांच्या हस्ते जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. या योजनेसाठी १ कोटी ३० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.

टीम ॲग्रोवन

इंदापूर, जि. पुणे ः ‘‘मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने मला आमदार म्हणून दोन वेळा निवडून दिले आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध व खंबीर असून घराघरात नळ पाणीपुरवठा योजना (Water Supply Scheme) पोहोचविणारच आहे,’’ अशी ग्वाही देत न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये,अशी टीका माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी केली.

बळपुडी (ता. इंदापूर) येथे भरणे यांच्या हस्ते जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. या योजनेसाठी १ कोटी ३० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. या वेळी बोलताना भरणे म्हणाले, ‘‘तालुक्यातील १४६ गावांतील जलजीवन मिशन या योजनेचा १५० कोटींचा प्रारूप आराखडा तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला होता.

या योजनेतील बहुतांशी कामे आत्तापर्यंत टेंडर घेऊन प्रत्यक्षात चालू झाली आहेत. जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील कामे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केली आहेत. ही कामे एप्रिल तसेच मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना तांत्रिक मान्यता घेऊन शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवली आहेत. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली होती. तसेच, काही कामे मंजुरीसाठी सादर केली होती. जून महिन्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले. या सरकारमध्येही पाणीपुरवठामंत्री म्हणून गुलाबराव पाटील हे आहेत. इंदापूरची पाठवलेली सर्व कामे हे मंत्री पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केल्याची माहिती त्यांना दिली आहे.’’

या वेळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह ग्रामपंचायतीचे उपसरपंच केशव काळेल, आप्पासो खताळ, नंदू भुजबळ, सुनील देवकाते, बाळासो गाढवे, आबा करे, रमेश करे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळपुडी सोसायटीचे चेअरमन प्रताप गाढवे यांनी तर, नीलकंठ गिरी यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा शब्द पाळू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेतकऱ्यांना आश्वासन

Inspiring Farmer Story: सुखी संसाराची वाट शोधणारे दाम्पत्य

BJP Mumbai President: भाजपकडून आमदार अमित साटम यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी

Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा कोणताही विचार नाही

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

SCROLL FOR NEXT