Swachh Bharat Abhiyan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Swachh Bharat Mission : वाशीम जिल्ह्यात ‘शाश्‍वत स्वच्छ गाव पुरस्कार योजना’

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील गावांना प्रेरणा मिळावी आणि लोकसहभाग वाढावा म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने नेहमी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.

Team Agrowon

Swachh Bharat Mission वाशीम ः गावाचा स्वच्छतेचा (Cleanliness) दर्जा टिकून राहावा, गाव स्वच्छ झाले तर ते डोळ्यांनी दिसावे, पाहताक्षणी गावाची स्वच्छता नजरेत भरावी यासाठी जिल्हा परिषदेच्या (Washim ZP) पुढाकारातून शाश्‍वत स्वच्छ गाव पुरस्कार योजना (Swachh Bharat Scheme) सुरू केली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील गावांना प्रेरणा मिळावी आणि लोकसहभाग वाढावा म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने नेहमी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे यांच्या पुढाकाराने ‘तुझं गावच, नाही का तीर्थ’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. त्या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेतली होती.

याच उपक्रमात गावात ग्राम स्वच्छता निगरानी समित्यांची स्थापना करून त्यांना भास्कर पेरे यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले होते.

आता शाश्‍वत स्वच्छ गाव पुरस्कार देण्याचा निर्णय वाशीम जिल्हा परिषदेने घेतला असून, जिल्हा परिषदेच्या अंदाज पत्रकात यासाठी १६ लाख ५० हजारांची तरतूद करण्यात आली आहे.

अशा प्रकारचा पुरस्कार देणारी वाशीम ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद असावी, असा विश्‍वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

फेब्रुवारी खेर प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या गावाची निवड करून सदर गावांची नावे जिल्ह्याला कळवावी आणि १५ मार्चला अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आहे. या बाबत सर्व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.

पुरस्कार

तालुकास्तर - प्रथम एक लाख, द्वितीय ५० हजार, तृतीय २५ हजार

जिल्हास्तर - प्रथम तीन लाख, द्वितीय दोन लाख, तृतीय एक लाख

नवीन गावांना संधी

शाश्‍वत स्वच्छ गाव पुरस्कार योजना जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीअंतर्गत गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. मात्र ज्या गावांना अथवा ग्राम पंचायतींना मागील तीन वर्षांत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला असेल त्या गावांना शाश्‍वत स्वच्छ गाव पुरस्कार देण्यात येणार नाही.

बक्षिसातून स्वच्छतेची कामे करण्याचे बंधन

ज्या गावांना हा पुरस्कार मिळेल त्या गावांनी आपले गाव शाश्‍वत स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी या रकमेचा विनियोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणते कामे करायची याची यादी ग्राम पंचायतींना पुरविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT