Animal Care Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Cow Buffalo Subsidy : गाई-म्हशी खरेदीसाठी अनुदान मिळणार

राज्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात त्यामुळे शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत गेल्या अनेक वर्षापासून दोन गाई किंवा दोन म्हशी खरेदी करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून अनुदान दिले जाते.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर : पशुसंवर्धन विभागाच्या (Animal Husbandry) नावीन्यपूर्ण योजनेतून (Animal Husbandry Scheme) यावर्षी राज्यातील २८ जिल्ह्यांतील १७ हजार ७०४ शेतकऱ्यांना दुधाळ गट योजनेतून (Milch Group Scheme) गाई-म्हशी खरेदी (Cow Buffalo Subsidy Scheme) करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

राज्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात त्यामुळे शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत गेल्या अनेक वर्षापासून दोन गाई किंवा दोन म्हशी खरेदी करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून अनुदान दिले जाते. सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अशा तीन प्रवर्गात ही योजना राबवली जात आहे.

योजनेची रक्कम ८७ हजार ५०० रुपये निश्चित केलेली असून दुधाळ गट योजनेत निवड झालेल्या सर्वसाधारण लाभार्थ्याला ५० टक्के अनुदानानुसार ४३ हजार ७५० रुपये तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याला ७५ टक्के अनुदानानुसार ६५ हजार ६२५ रुपयाचे अनुदान दिले जात आहे.

यावर्षी राज्यात तिन्ही प्रवर्गातील मिळून सुमारे १७ हजार ७०४ लाभार्थ्यांना या योजनेत लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यावर्षी नव्याने ११ जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांकडून पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

मागणी अर्जाची संख्या पाहता निश्चित केले जाणारे उद्दिष्ट अल्प आहे. गेल्यावर्षी अर्ज केलेले एक लाखापेक्षा अधिक शेतकरी लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

पाच जिल्ह्यांत योजना नाही

पशुसंवर्धन विभागाच्या नावीन्यपूर्ण (राज्यस्तरीय) योजनेत नगर, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश नाही. त्यामुळे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज भरता येत नाहीत. यंदाही या जिल्ह्याला उद्दिष्ट दिलेले नाही.

नावीन्यपूर्ण योजनेतून दुधाळगट

वाटप लक्ष्यांक (जिल्हानिहाय) (२०२२-२३)

अकोला ः ६४२, अमरावती ः १००४, उस्मानाबाद ः ६५१, औरंगाबाद ः ७९०, चंद्रपूर ः ६९६, गडचिरोली ः ३६६, गोंदिया ः ४८६, जळगाव ः ९६०, धुळे ः ४२३, नांदेड ः १२३८, जालना ः ६६८, नंदुरबार ः ४४७, बीड ः ८४५, नाशिक ः १०११, नागपूर ः ६३६, परभणी ः ५२१, यवतमाळ ः ८२४, बुलडाणा ः १०४२, भंडारा ः ४३८, रायगड ः ३७४, लातुर ः ९४३, वर्धा ः३९२, वाशीम ः ५२७, सिंधुदुर्ग ः ११९, हिंगोली ः ४५६, ठाणे ः ३१९, पालघर ः ४०३, रत्नागिरी ः २३४,

प्रवर्गनिहाय यंदाचे उद्दिष्ट

सर्वसाधारण ७७५३

अनुसूचित जाती ९२२९

अनुसूचित जमाती ७२२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Scheme : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या दोन योजनांचे करणार मूल्यमापन; योजना बंद होणार?

E-Peek Pahani : शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणीची कसरत

Agrowon Podcast: हरभरा बाजारभाव स्थिर; वांगी व लसणाचे दर टिकून, हळदीची मागणी कायम तर उडदाचा भाव दबावात

Rabi Jowar: चांगले उत्पादन देणारे रब्बी ज्वारीचे चार वाण

Banana Cluster : ‘बनाना क्लस्टर’मध्ये गुंतवणुकीची संधी

SCROLL FOR NEXT