Turmeric Subsidy Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Turmeric Subsidy : हळद लागवडीसाठी चार हेक्टरपर्यंत अनुदान

राज्यातील हळद क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हळद लागवडीकरिता चार हेक्टरपर्यंत अनुदान द्यावे, असे आदेश शासनाने दिले आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्यातील हळद क्षेत्र (Turmeric Acreage) वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हळद लागवडीकरिता (Turmeric Cultivation) चार हेक्टरपर्यंत अनुदान (Turmeric Subsidy) द्यावे, असे आदेश शासनाने दिले आहेत. हळदीचे व्यापारी उत्पादन (Turmeric Production) घेणाऱ्या उत्पादकांना अनुदान न देण्याचे धोरण २०१८-१९ पासून घेण्यात आले होते. ते आता मागे घेण्यात आले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील क्षेत्रविस्तार या घटकात ‘मसाला पीक हळद रोपवाटिका’ ही बाब नव्या नियमांसह लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी त्याबाबत सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना हळद उत्पादकांचे प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी राज्यातील हळद रोपवाटिकाधारकांची यादी तयार करावी. या रोपवाटिकांची तपासणी करून प्रमाणित रोपवाटिकांची यादी तालुक्यांना उपलब्ध करून द्यावी, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. हळद लागवडीचे अनुदान प्रस्ताव ‘महाडीबीटी’मधून स्वीकारले जाणार आहेत. ठिबक संच, मल्चिंग अशा तंत्रावर आधुनिक पद्धतीने हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देताना प्राधान्य मिळणार आहे.

कृषी आयुक्तांनी काय सूचना दिल्या?

एका शेतकऱ्याला लागवडीसाठी किमान ०.२० हेक्टरपर्यंत व कमाल चार हेक्टरपर्यंत अनुदान देता येईल.

लागवड साहित्य खात्रीशीर रोपवाटिकांमधून उपलब्ध करून द्या. त्यासाठी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत.

रोपवाटिकांमधून बियाणे मिळत नसल्यास शेतकऱ्यांकडील कंद वापरता येतील. मात्र त्याची तपासणी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी करावी.

स्थानिक कंद स्वीकारल्यास लागवड करणारा शेतकरी, कंद पुरवणारा शेतकरी व मंडळ कृषी अधिकारी यांचा त्रिपक्षीय करार होईल.

हळद लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी लागवड भागात शेतकरी सहलींचे आयोजन करावे.

लागवड खर्च प्रतिहेक्टरी ३० हजार रुपये

कंदवर्गीय मसाला पिकात हळदीचा समवेश करीत हळदीचा लागवड खर्च प्रतिहेक्टरी ३० हजार रुपये इतका गृहीत धरण्यात आलेला आहे. लागवडीच्या ४० टक्क्यांपर्यंत म्हणजेच जवळपास १२ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. रोपवाटिका तयार करणाऱ्या शेतकऱ्यालाही १२ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. मात्र रोपवाटिकेचे लागवड क्षेत्र किमान ०.५० हेक्टर व कमाल एक हेक्टरपर्यंत राहील, अशी अट टाकण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT