Agriculture Mechanization Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Mechanization : पाच महिने उलटले तरीही मिळेना अनुदान

Mechanization Scheme Subsidy : कृषी यांत्रिकीकरण अभियान योजनेमधून अवजारे बँकेसाठी दाखल प्रकल्पाचे अनुदान पाच महिन्यांपासून मिळालेले नाही.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : कृषी यांत्रिकीकरण अभियान योजनेमधून अवजारे बँकेसाठी दाखल प्रकल्पाचे अनुदान पाच महिन्यांपासून मिळालेले नाही. या संदर्भात शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनाही त्याची प्रत दिली आहे.

या संदर्भात देवगाव (ता. पैठण) येथील शेतकरी अशोक अण्णासाहेब ढाकणे यांनी कृषिमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रानुसार, त्यांचा आत्मा अंतर्गत शेतकरी गट आहे. १२ जानेवारी २०२३ रोजी या गटाद्वारे तालुका कृषी अधिकारी पैठण यांच्याकडे अवजारे बँकेसाठी अर्ज दाखल केला.

तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ट्रॅक्टर आणि सर्व अवजारे खरेदी केली. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषी अधिकारी पैठण कार्यालयाकडे ती कागदपत्रे दाखल केली. १४ जानेवारी रोजी कृषी अवजारे बँकेची स्थापना या बाबीसाठी कृषी विभागाकडे ऑनलाइन अर्ज केला.

अवजारे बँकेसाठी अनुदानाची फाइल छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात जवळपास पाच महिन्यांपासून पडून आहे. परंतु अजूनही कृषी अनुदानाचा लाभ मिळाला नसल्याचे शेतकरी अशोक ढाकणे यांचे म्हणणे आहे.

कृषिमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पाच महिन्यांपासून आपण पैठण कृषी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे खेटे मारत असल्याचेही शेतकरी ढाकणे यांनी सांगितले.

...तर काय उपयोग? ’

सामान्य बाबीसाठी शेतकऱ्याला कृषिमंत्र्याकडे निवेदन द्यावे लागत असेल तर काय उपयोग, असा सवाल करत आम्ही शेतकरी करंटे म्हणून जन्माला येऊ आणि तसेच मरू, असा खेदही ढाकणे यांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage: पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांचा संताप; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांसह आमदारांना शेतकऱ्यांनी घेरलं

Spurious Fertilizer: शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर राजस्थानच्या कृषिमंत्र्यांची धडक कारवाई; बोगस खताच्या ६४ हजार पिशव्या जप्त

Fish Processing: मत्स्य प्रक्रिया, मूल्यवर्धनातील संधी

Bhaskar Chandanshiv: चंदनशिव गेले तरी अजरामरच!

Bhaskar Chandanshiv: तेजोमय ‘भास्कर’

SCROLL FOR NEXT