Jalyukt Shiwar
Jalyukt Shiwar Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Jalyukt Shiwar Scheme : ‘जलयुक्त’साठी १६६ गावांची निवड

Team Agrowon

Solapur News तालुकास्तरीय समितीने शिफारस केलेल्या १६६ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना (Jalyukt Shiwar Yojana) टप्पा-दोन राबविण्यात येणार असून, विभागीय आयुक्तांनी दिलेल्या १७५ गावांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उर्वरित नऊ गावांच्या निवडीबाबत तालुकास्तरीय समितीने फेरतपासणी करून गावांची यादी तयार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

जलयुक्त शिवार टप्पा- २ च्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एम. जे. शेख, जिल्हा जलसंधारण अधिकारी (जि. प.) पी. बी. भोसले, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी डी. ए. दामा यांच्यासह जिल्ह्यातील विविध उपविभागीय जलसंधारण अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, की जिल्ह्यातील एकूण १ हजार १५७ गावांपैकी ९३३ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना टप्पा एक अंतर्गत कामे झाली असून, ती जलपरिपूर्ण असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून निदर्शनास आले आहे.

टप्पा २ साठी २२४ गावे निवडीसाठी शिल्लक होती. तालुकास्तरीय समितीच्या बैठका संपन्न होऊन २२४ पैकी १६६ गावांची टप्पा दोनसाठी शिफारस करण्यात आली. गावांच्या निवडीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार १६६ गावांची निवड अंतिम करण्यात आली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे आणि डी. ए. दामा यांनी या कामांच्या आनुषंगिक माहिती सादर केली.

आठ तालुक्यांतील गावांचा समावेश

तालुकास्तरीय समितीने शिफारस केलेल्या १६६ गावामध्ये सांगोला, मंगळवेढा आणि उत्तर सोलापूर तालुके वगळता अन्य आठ तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय गावांमध्ये अक्कलकोट ११, बार्शी १, करमाळा ३, माढा ८, माळशिरस ७०, मोहोळ २५, पंढरपूर ४७, दक्षिण सोलापूर १ एकूण- १६६ गावांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather News : राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

Tur Rate : तूरडाळ, तांदळाच्या दरात सुधारणा

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT