Team Agrowon
जलयुक्त शिवार योजना पहिल्या टप्प्यात प्रभावीपणे राबविण्यात आल्यानंतर राज्य सरकारने या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे.
या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील ८५ गावांत जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यात येणार आहे.
त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो.
पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत राबविण्यात आले होते.
यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान १.० मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील ४२३ गावांत यशस्वी अंमलबजावणी करून शेतीसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे.
नंदुरबार तालुक्यातील २० गावे, नवापूर ६, शहादा १४, तळोदा ९, अक्राणी १७, तर अक्कलकुवा १९ अशा प्रकारे ८५ गावांचा समावेश असणार आहे.