PM Kisan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM KIsan : ‘किसान’ योजनेसारखी योजना विचाराधीन ः मंत्री डॉ. गावित

‘हर घर नल से जल’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रत्येक गावागावात घराघरांत पाणी पोचविणे तसेच, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सारखी योजना राज्य सरकार आणण्याच्या विचाराधीन आहे.

टीम ॲग्रोवन

वडाळी, जि. नंदुरबार : ‘हर घर नल से जल’ (Water Scheme) या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रत्येक गावागावात घराघरांत पाणी पोचविणे तसेच, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सारखी योजना (PM Kisan Scheme) राज्य सरकार आणण्याच्या विचाराधीन आहे. समाजातील प्रत्येक शिधापत्रिका धारक व्यक्तीला घर, ग्रामीण भागातील गाव-पाड्यापर्यंत रस्ते, जिल्ह्यातील विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

वडाळी (ता.शहादा) येथे पाणीपुरवठा स्वच्छता विभाग जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार डॉ. हीना गावित होत्या. तर जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, सदस्या वृंदावनी नाईक, पंचायत समिती सदस्या अरुणाबाई भील, सरपंच जयाबाई ठाकरे, गिरीश जगताप, उपसरपंच अभय गोसावी, दीपक पाटील, भाजप तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सी. ए. निकुंभ,

कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, विस्तार अधिकारी श्री. वरसाळे, हिंमत सोनवणे, कल्पना मोहिते, मधुकर धनगर, कोंढावळ सरपंच गोपाल भील, तेजस्विनी गिरासे, बापू मराठे उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून उत्तम शेती करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा,’’ असे आवाहन त्यांनी केले.

वडाळीसाठी पावणेपाच कोटी : डॉ. हीना गावित

खासदार डॉ. हीना गावित म्हणाल्या, की राज्य सरकारची मुख्यमंत्री पेय जल योजना व केंद्र सरकारची राष्ट्रीय पेय जल योजना यांना एकत्रित करून जलजीवन मिशन हर घर नल से जल योजना आणली. यात वडाळीसाठी ४ कोटी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविक उपसरपंच अभय गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन गोरख वाल्हे यांनी तर आभार प्रताप चव्हाण यांनी मानले. ग्रामविकास अधिकारी बी. बी. देसले, उत्तम माळी, संदीप माळी, पंकज निकम, विजय गोसावी, दीपक माळी आदींसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Return Monsoon : गेले परतीच्या वाटे...

Insurance Reform Bill : हिवाळी अधिवेशनात विमा सुधारणा विधेयक मांडणार

Onion Market : लासलगाव बाजार समितीत नवीन खरीप कांद्याची आवक

Sugarcane Farming : राज्यात सलग पावसामुळे ऊसपट्ट्यावर संकटाची छाया

Rabi Season : रब्बी विकसित कृषी संकल्प अभियानावर तज्ज्ञांचा बहिष्कार

SCROLL FOR NEXT