Team Agrowon
पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm Kisan) योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजारांची मदत केली जाते.
शेतकऱ्यांना या योजनेत (Farmer Scheme) ४ महिन्यांच्या अंतराने ३ टप्प्यात २-२ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात.
या योजनेच्या १२ टप्प्यांचे वाटप करण्यात आले आहे. १३ वा टप्पा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकते.Agrowon
८ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १२ व्या टप्प्यातील रक्कम जमा करण्यात आली होती.
१३ व्या टप्प्यातही ८ कोटींच्या जवळपास शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळू शकतात. त्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल असे शेतकरी १३ व्या टप्प्यापासून वंचित राहू शकतात.