कर्जमाफी
कर्जमाफी Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना असा मिळेल प्रोत्साहनपर लाभ

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Farmer Loan Waive Scheme) २०१९ चा विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

योजनेसाठी विचाराधीन कालावधी : २०१७-१८, २०१८-१९ तसेच २०१९-२०

...असा मिळेल नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ

...असे आहेत निकष

- २०१७-१८ या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्ज ३० जून २०१८ पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असावे

- २०१८-१९ या वर्षातील अल्पमुदत पीककर्ज ३० जून २०१९ पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असावे

- २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत पीककर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केले असावे.

तर...

२०१९-२० या वर्षातील अल्पमुदत पीककर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे.

मात्र...

२०१९-२० या वर्षातील घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीककर्जाची रक्कम ५० हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या मुदलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

...असा मिळेल लाभ

लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन ५० हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ निश्‍चित करण्यात येईल.

या कर्ज पुरवठादारांचा विचार

राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत पीककर्ज विचारात घेण्यात येणार.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु कोरोनामुळे ही योजना लांबली होती. या मार्च महिन्यातील अधिवेशनामध्ये शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याची घोषणा केली होती. त्यांची अंमलबजावणी एक जुलैला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनापासून सुरू होईल.
बाळासाहेब पाटील, सहकारमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT