E Peek Pahani Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

E - Peek Survey : ई-पीकद्वारे ३ लाख ४३ हजार हेक्टरवरील पीक पेऱ्यांची नोंद

परभणी जिल्ह्यातील स्थिती ; पावणेतीन शेतकऱ्यांनी केली ई-पीकपाहणी

टीम ॲग्रोवन

परभणी : या वर्षीच्या (२०२२) खरीप हंगामात (Kharip Season) शनिवार (ता. २२) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार ३०१ पैकी २ लाख ७२ हजार ५०१ शेतकरी खातेदांरानी (५०.९१ टक्के) ३ लाख ४३ हजार ४९३.०७ हेक्टर (५६.५६ टक्के) एवढ्या क्षेत्रांवरील पीक पेऱ्याची नोंद ई-पीक अॅपद्वारे (E- Crop App) केली आहे. परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये एकूण ५ लाख ३५ हजार ३०१ शेतकरी खातेदारांच्या शेती खात्यांचे एकूण क्षेत्र ६ लाख ७ हजार २७०.३४ हेक्टर आहे.

या वर्षी च्या खरीप हंगामातील पेरणीक्षेत्र ५ लाख १० हजार ७२४ हेक्टर आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणीसाठी शनिवार (ता.२२) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत एकूण २ लाख ७२ हजार ५०१ शेतकरी खातेदारांनी ई-पीकपाहणी केली. ई-पीकपाहणीचे एकूण क्षेत्र ३ लाख ४८ हजार ९७२.५४ हेक्टर आहे.

त्यात ३ लाख ४३ हजार ४९३.०७ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पीकपेरा आहे, तर एकूण ४ हजार ६३.२९ हेक्टर क्षेत्र कायम पड आहे, तर चालू पड क्षेत्र १ हजार ४१६.१९ हेक्टर आहे. ई-पीकपाहणी करणाऱ्या शेतकरी खातेदारांचे सर्वात कमी प्रमाण जिंतूर तालुक्यात ४४.१२ टक्के, तसेच क्षेत्राचे प्रमाण ४५.०९ टक्के आहे. सर्वाधिक प्रमाण मानवत तालुक्यात ६०.९४ टक्के शेतकरी खातेदार आणि क्षेत्र ६६.७६ टक्के आहे.

यंदा ई-पीकपाहणी मोबाईल अॅपचे अपडेटेड व्हर्सन गुगल प्ले स्टोअर उपलब्ध आहे. शेतकरी स्तरावर मोबाईल अॅपद्वारे प्रत्यक्ष ई-पाहणी करण्यासाठी शनिवार (ता. १५) पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु उशिराच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीकसाठी शनिवार पर्यंत मुदतवाढ दिली होती. तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणीचा कालावधीत २३ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांची इच्छा असूनही ई-पीकपाहणीसाठी अडचणी येत आहेत. सर्व संबंधितांकडून पुरेशा प्रचार प्रसिद्धी अभावी अजूनही असंख्य शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी प्रक्रियेबाबत माहिती नाही. त्यामुळे संपूर्ण शेतकरी खातेदारांनी ई-पीकपाहणी केली नसल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT