Jal Jeevan Mission Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Jal Jeevan Mission : जल जीवन मिशनची कामे गुणवत्तापूर्ण करा ः खांडेकर

जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे गुणवत्तापूर्वक आणि जलद गतीने होतील. त्याचा लाभ प्रत्येक नागरिकाला होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी केल्या आहेत.

टीम अॅग्रोवन.

परभणी ः जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत पाणी पुरवठ्याची (Water Supply) कामे गुणवत्तापूर्वक आणि जलद गतीने होतील. त्याचा लाभ प्रत्येक नागरिकाला होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी केल्या आहेत.

जिल्हास्तरीय आढावा बैठकीत गुरुवारी (ता. १०) त्या बोलत होत्या. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार यांची उपस्थिती होती. खांडेकर म्हणाल्या, की प्रत्येक घराला नळजोडणी देणे आवश्यक आहे. प्रत्येक घराला नळजोडणी झाली आहे का, याची संबंधित ग्रामसेवकांनी खात्री करावी.

नळजोडणी झालेल्या कुटुंबाच्या नोंदी शासनाच्या संकेतस्थळावर करावी. त्याच बरोबर विहिरीची जागा, जलकुंभाची जागा, पाणी शुद्धीकरण केंद्राला देण्यात येणारी जागा इत्यादी जमीन ग्रामपंचायतीच्या नावे लावण्याबाबत देखील सुचवले.

जलजीवन मिशन कार्यक्रमाची सद्यःस्थिती

एकूण ग्रामपंचायती ७०४

एकूण गावे ८२७

एकूण वाड्या १०८०

रेट्रोफिटींग/नवीन योजना ६९०

भूजल सर्वेक्षण पूर्ण ६९० अंदाजपत्रक तयार ६९० (१०० टक्के) तांत्रिक मान्यता प्राप्त गावे ६८६ (९९.४२ टक्के) प्रशासकीय मान्यताप्राप्त गावे ६८२ (९८.६४ टक्के) निविदा प्रक्रिया झालेली गावे ६७१ (९७.२४ टक्के) कार्यारंभ आदेश निर्गमित गावे ५६५ (८१.८८ टक्के).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Geo Tagging Inspection: पथकाकडून विमा संरक्षित बागांची पाहणी

Agricultural Pumps: कृषी पंपांना मिळेना अखंडित वीजपुरवठा

Illegal Sand Mining: अवैध वाळू उपशाविरोधात महसूल विभागाची कारवाई

Threshing Season: रायगड जिल्ह्यात ‘मळणी’चा उत्सव सुरू

Agriculture Bhavan: अमरावतीच्या कृषी भवनला हवा इच्छाशक्‍तीचा टेकू 

SCROLL FOR NEXT