Crop Insurance  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance Awareness : पीकविम्याची प्रत्येक तालुक्यात फिरत्या रथाद्वारे जनजागृती

Crop Insurance Scheme : एक रुपयातील पीकविमा योजनेची जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फिरत्या रथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

Team Agrowon

Pune News : एक रुपयातील पीकविमा योजनेची जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फिरत्या रथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देणारा फिरता रथ प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी दोन दिवस फिरणार आहे.

याची सुरुवात सोमवारी (ता. १७) हवेली व शिरूर या दोन तालुक्यांपासून करण्यात आली आहे. या रथाचा प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. दोन रथांद्वारे ही जनजागृती केली जाणार आहे.

खरीप हंगामातील कोणत्या पिकांसाठी ही विमा योजना लागू आहे, त्यासाठी पात्र शेतकरी कोणते, या योजनेच्या लाभासाठी आवश्‍यक कागदपत्रे कोणती, अर्ज कसा करावा, पिकांचे कोणत्या कोणत्या घटनांनी नुकसान झाल्यास या विमा योजनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळू शकेन, याबाबत या रथाद्वारे जनजागृती केली जाणार असल्याचे पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते यावेळी एक रुपयात पीक विमा योजनेची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, कृषी उपसंचालक संजय विश्वासराव, उपविभागीय कृषी अधिकारी सूरज मडके, तंत्र अधिकारी रूपाली बंडगर आदी उपस्थित होते.

तालुकानिहाय वेळापत्रक

रथ क्रमांक एक

- खेड --- १९ व २० जुलै

- जुन्नर --- २१, २२ व २३ जुलै

- आंबेगाव --- २४ व २५ जुलै

- मावळ २६ व २७ जुलै

- मुळशी --- २८, २९ व ३० जुलै

रथ क्रमांक दोन

- दौंड --- १९ व २० जुलै

- बारामती --- २१ व २२ जुलै

- इंदापूर --- २३ व २४ जुलै

- पुरंदर --- २५ व २६ जुलै

- भोर --- २७ व २८

- वेल्हे --- २९ व ३० जुलै

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT