Jan Smarth Portal  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘जन समर्थ’ पोर्टलचे उद्घाटन

६ जून रोजी या पोर्टलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

टीम ॲग्रोवन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी १२ मार्च २०२१ पासून भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्धापन दिनानिमित ७५ आठवड्यांची प्रतीक्षा म्हणून ‘आझादी का अमृत महोत्सव’चे (Azadi Ka Amrut Mahottsav) उद्घाटन केले होते. या उत्सवाचा भाग म्हणून दर आठवड्यात एक नवीन उपक्रम घेण्याची घोषणा करण्यात आली होती.

या आठवड्यात एका नवीन क्रेडिट लिंक्ड पोर्टल ‘जन समर्थ’ या नावाने सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ जून रोजी या पोर्टलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

अर्थ सेवा सचिव संजय मल्होत्रा म्हणाले की, “या कार्यक्रमाच्या पाहिळल्या दिवशी ८ सरकारी विभागांच्या १३ योजनांचे क्रेडिट- लिंक्ड पोर्टल प्रदर्शित करण्यात येणार आहे. या पोर्टलमुळे विविध योजनांवर लाभार्थी लक्ष ठेवू शकतील. पुढे आम्ही त्यात जास्तीत जास्त योजनांचा समावेश करणार आहोत. त्याचबरोबर या पोर्टलला बँकाशी जोडून लाभार्थीसाठी प्रक्रिया सोपी करणार आहोत.”

याशिवाय ८ जून रोजी सर्व जिल्हा कार्यालयात क्रेडिट आउटरीच कार्यक्रम होणार आहे. यामध्ये विविध सरकारी कार्यक्रमांतर्गत नावनोंदणी, सरकारी संरक्षण योजना, क्रेडिट-लिंक्ड योजना आणि आर्थिक साक्षरता यांचा समावेश असेल, असेही मल्होत्रा ​​यांनी सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT