PM Kisan Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan Scheme Login : लॉग-इन आयडीअभावी शेतकऱ्यांची हेलपाटे

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता या महिन्यात बळीराजाच्या खात्यात जमा होणार आहे.

हेमंत पवार  

हेमंत पवार

कऱ्हाड : पीएम किसान योजनेच्या (Pm kisan scheme) लाभार्थ्यांची पुढील कार्यवाही आता महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या योजनेचे हस्तांतर होऊन अनेक दिवस झाले तरीही महसूल विभागाकडून कृषी विभागाला (Agriculture department) लॉग-इन आयडी आणि पासवर्डच देण्यात आलेला नाही.

त्यामुळे शेतकरी आता दोन्ही विभागाकडे हेलपाटे मारून पुरे वैतागले आहेत. त्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांनीच तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता या महिन्यात बळीराजाच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेतंर्गत तेरावा हप्ता २७ फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठीची कार्यवाही महसूल विभागाने आत्तापर्यंत पार पाडली. त्यासाठी शेतकऱ्यांची कागदोपत्री कार्यवाही करून त्यांनी घेतली. त्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी होत्या.

त्या दुरुस्त करून देण्यासह ज्यांची नावे आलेली नाहीत त्यांची नावे का आली नाहीत, याबाबतचा पाठपुरावाही महसूल विभागाने सातत्याने केला होता. आता कृषी विभागाकडूनी कार्यवाही केली जाणार आहे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागाला त्यासंदर्भातील लॉग-इन आयडी आणि पासवर्डच देण्यात आलेला नाही.

त्यामुळे शेतकरी त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी महसूल विभागाकडे गेला की त्याला कृषी विभागाकडे पाठवले जाते आणि तेथे गेल्यावर कृषी विभागाकडून लॉग-इन आयडी आणि पासवर्ड देण्यात आलेला नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी हेलपाटे घालून वैतागले आहेत.

यासाठी घालतात शेतकरी हेलपाटे

अनेकदा शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक असूनही पैसे येत नाहीत, एकाच्या खात्यावर दुसऱ्याच कोणाचा अकाऊंट नंबर पडलेला असतो त्यामुळे पैसे जमा होत नाहीत.

काही शेतकरी मृत झालेले असतात त्यांचे पैसे येतात, मात्र त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्याने वारसांना पैसे काढता येत नाहीत. अनेक तांत्रिक अडचणीही भेडसावतात. त्यांना महसूल विभागाकडे हेलपाटे घालावे लागत होते.

पोस्ट बॅंकेत खाते उघडण्याचे आवाहन

पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होते. प्रलंबित लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन ई-केवायसी करून घ्यावे.

त्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी किंवा बँक खाते इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत उघडावे. तसेच बँकेत जाऊन ई केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity: नाशिक जिल्ह्यात १०८४ गावांमध्ये संभाव्य टंचाई

Local Body Elections: रत्नागिरी,सिंधुदुर्गात उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Leopard Sightings: बिबट्याच्या त्रासाने शेतकरी हैराण

Local Body Elections: कोल्हापुरात वैयक्तिक गाठीभेटींना प्राधान्य

Agriculture Festival: ‘कृषिपर्व’ महोत्सवात एआय वर विशेष मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT