POCRA  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

POCRA : पोकरा योजनेची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावी ः दादा भुसे

मालेगाव तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच या योजनेची सर्व प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केल्या.

टीम ॲग्रोवन

मालेगाव, जि. नाशिक : मालेगाव तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा (Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana) लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच या योजनेची (POCRA Scheme) सर्व प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केल्या.

मालेगाव विश्रामगृह येथे पालकमंत्री भुसे यांनी शनिवारी (ता. ५) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची (पोकरा) आढावा बैठक घेतली. त्यात ते बोलत होते. प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, मंडल कृषी अधिकारी संदीप पवार, ज्ञानदेव शिंदे, अशोक गिरगुणे, मोहनीराज मोरे, गणपत शिंदे, सुधाकर सोनवणे, मच्छिंद्र बारे, अनिल बच्छाव, समाधान कदम, रत्ना सूर्यवंशी, राहुल जाधव, शीतल निकम, दीपमाला ठोठरे आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, की कृषी विभागाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा घेऊन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधावा. मालेगाव तालुक्यात चालू हंगामात एकूण ४५ हजार ९५७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यातील ३६ हजार शेतकऱ्यांनी कांदा, कापूस, मका, बाजरी, ज्वारी या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असल्याचे सूचनापत्र दिले होते.

त्यानुसार विमा कंपनीने पंचनामे पूर्ण करून प्रथम टप्प्यात आतापर्यंत १७ हजार ७३ शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी सुमारे ५ कोटी ५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. त्याचप्रमाणे उर्वरित शेतकऱ्यांनाही येत्या १५ दिवसांत पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारी दिलीप देवरे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purpravan Gave: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६५ गावे पूरप्रवण

Alu Farming Success: वर्षभर अळूला तयार केली बाजारपेठ

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

SCROLL FOR NEXT