PM Kisan Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : ‘पीएम किसान’चे प्रलंबित लाभार्थींनी बँक खाते उघडावे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेर्गंत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे सहा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो.

Team Agrowon

सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत (PM Kisan Scheme) १३ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते (Bank Account) अनिवार्य केलेले आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (India Post Payment Bank) ०१ ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राज्यात यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट कर्मचारी यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे.

आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक विकास पाटील (Vikas Patil) यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेर्गंत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे सहा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो.

योजनेच्या १३ व्या हप्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने १३ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.

राज्यात सद्यःस्थितीत १४.३२ लाख लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थींच्या खात्यात १३ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही, असेही पाटील म्हणाले.

४८ तासात आधारलिंक सुविधा

योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टरमार्फत उपलब्ध करण्यात आली आहे.

यासाठी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे.

सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल, पात्र लाभार्थ्यांना या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी संचालक पाटील यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Car Blast: दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू, २४ जखमी, हाय अलर्ट जारी

Sugarcane Farming: अहिल्यानगरला चौतीस हजार हेक्टरवर ऊस लागवड

NCP Alliance Local Polls: मुश्रीफांनी 'भाजप'चा डाव ओळखला, मध्यस्थी करत दोन्ही राष्ट्रवादींना आणले एकत्र

Rabi Sowing: रब्बीची ५३ हजार ९६० हेक्टरवर पेरणी

MSP Registration: बायोमेट्रिक नोंदणीच्या नावावर शेतकऱ्यांचा नाहक छळ

SCROLL FOR NEXT