Farm Pond Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farm Pond Scheme Scam : शेततळे गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश

Agriculture Irrigation : या योजनेच्या अनुदानवितरणात संशयास्पद कामांना मंजुरी दिली जात असल्याबद्दल कृषी आयुक्तालयाने चौकशी सुरू केली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात मुख्यमंत्री वैयक्तिक शेततळे योजना वादात सापडली आहे. या योजनेच्या अनुदानवितरणात संशयास्पद कामांना मंजुरी दिली जात असल्याबद्दल कृषी आयुक्तालयाने चौकशी सुरू केली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मृद्‍संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालकांच्या अखत्यारित शेततळ्यांची योजना नियंत्रित केली जाते.

योजनेबाबत काही जिल्ह्यांमधून तक्रारी आलेल्या आहेत. विशेषतः नगर जिल्ह्यातील शेततळ्यांबाबत गंभीर स्वरूपाचे मुद्दे उपस्थित केले गेले आहेत. त्यामुळे मृद्‍संधारण संचालक रवींद्र भोसले यांनी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मृद्‍संधारण विभागाकडे चौकशीसाठी स्वतःची यंत्रणा नाही. त्यामुळे कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून ही चौकशी होईल, असे सांगण्यात आले आहे.

मृद्‍संधारण विभागाचे सहसंचालक पांडुरंग शेळके यांनी पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांना चौकशी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. “पारनेरच्या रामराव सातकर यांनी दाखल केलेल्या शेततळ्याच्या तक्रारींबाबत विशेष चौकशी अधिकारी नेमावा व चौकशीचा सविस्तर अहवाल मृदसंधारण विभागाला सादर करावा,” असे सूचित करण्यात आले आहे.

विदर्भात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात जुन्या शेततळ्यांना नवा प्रस्ताव असल्याचे दाखवून पैसे लाटल्याची चर्चा होती. यात कृषी खात्याचे काही अधिकारी व ठेकेदार सामील असल्याची चर्चा असताना आता नगरमधील चौकशी सुरू झाल्यामुळे शेततळे योजना चर्चेत आली आहे. “या योजनेत गैरव्यवहार होऊ नये यासाठी अक्षांश- रेखांश असलेली छायाचित्रे काढली जातात.

तसेच कृषी विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष मोका तपासणी करतात. परंतु पैस लाटण्यासाठी या दोन्ही अटींवर उपाय काढण्यात आले आहेत. संगणकीय करामती करीत अक्षांश- रेखांश असलेली हवी तशी छायाचित्रे दाखवली जात आहेत. तसेच मोका तपासणीही बोगस होत असल्याचा संशय आहे,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहायकांकडून लूट

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र दिले आहे. शेततळ्यातील गैरव्यवहाराची कसून चौकशी करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. २० हजार रुपयांच्या मोबदल्यात ८-१० वर्षांपर्यंतच्या जुन्या शेततळ्यांवर अनुदान लाटले जात आहे. यात काही लोकप्रतिनिधींचे स्वीय सहायक शेतकऱ्यांकडून आगाऊ रकमा घेत असल्याचे मुंडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

‘उपग्रह प्रतिमांद्वारे अभ्यास शक्य’

“मृद्‍संधारण विभागातील काही अधिकारीदेखील या अनागोंदीला जबाबदार आहेत. जुन्या शेततळ्यांवर नवे प्रस्ताव दाखविले जात असल्याची चर्चा राज्यभर होत असताना मृद्संधारण विभाग गप्प का बसला, असा सवाल उपस्थित होतो. उपग्रह प्रतिमांद्वारे शेततळ्याच्या आधीच्या व नंतरच्या स्थितीचा अभ्यास करणे शक्य आहे. मात्र या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करण्याची तयारी मृद्संधारण विभागाची नाही,” असे एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT