Crop Insurance
Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा भरपाई देण्याची सुचना

टीम ॲग्रोवन

हिंगोली ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील (Crop Insurance Scheme) स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity) (अतिवृष्टी, पूर आदी) आणि काढणी पश्चात नुकसान या जोखीम बाबीअंतर्गंत पूर्वसूचना दाखल केलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ विमा भरपाई (Crop Damage Compensation) देण्याची सूचना जिल्हा संनियंण समितीच्या बैठकीत विमा कंपनीला करण्यात आली आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात यंदा जून ते ऑक्टोंबर या कालावधीत अनेकवेळा झालेली अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबीअंतर्गंत ३ लाख ७४ हजार पूर्वसूचना तर काढणी पश्चात नुकसान याबाबी अंतर्गत २३ हजार ९५८ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत.

त्याअनुषंगाने सर्वेक्षण पूर्ण झाल्यामुळे सर्व संबंधित शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम अदा करावी.तसेच हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाआधारे निश्चित होणाऱ्या पीकविमा परताव्यानुसार येणारी फरकाची रक्कम अदा करण्यात यावी अशा सूचना विमा कंपनीला देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्याची स्थिती अशी...

यंदाच्या खरिपात हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ४६ हजार ५३ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात सोयाबीन २ लाख ५७ हजार ४२९ हेक्टर, कपाशी ३२ हजार १५९ हेक्टर, तूर ३८ हजार ४१८ हेक्टर या पिकांचा समावेश आहे. एकूण ३ लाख ८० हजार ५०५ शेतकऱ्यांनी २ लाख २२ हजार ८५१ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. त्यात सोयाबीनसाठी २ लाख ४६ हजार ४६४ शेतकऱ्यांनी १ लाख ८६ हजार ७४४ हेक्टर, कपाशीसाठी २० हजार ७६६ शेतकऱ्यांनी ६ हजार ७२० हेक्टर, तुरीसाठी ५२ हजार ६०४ शेतकऱ्यांनी १५ हजार १८२ हेक्टरसाठी विमा संरक्षण घेतले आहे. नुकसानीच्या पूर्वसूचना सादर केलेले शेतकरी विमा भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT