NABARAD Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

NABARD :नाबार्डचे अनुदान पुन्हा सुरू करणार ः मंत्री विखे-पाटील

शेतकऱ्यांनी दूध देणाऱ्या जनावरांसाठी घेतलेल्या कर्ज रकमेवर नाबार्ड २५ टक्के अनुदान देत होते. ते नाबार्डने गेल्या तीन वर्षांपासून बंद केले आहे.

टीम ॲग्रोवन

वारणानगर, जि कोल्हापूर : शेतकऱ्यांनी दूध देणाऱ्या जनावरांसाठी घेतलेल्या कर्ज (Farmer Loan) रकमेवर नाबार्ड २५ टक्के अनुदान (Subsidy) देत होते. ते नाबार्डने (NABARD Subsidy) गेल्या तीन वर्षांपासून बंद केले आहे. शेतकरी हितासाठी अनुदान योजना (NABARD Subsidy Scheme) पूर्ववत सुरू करू, अशी ग्वाही महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishn Vikhe Patil) यांनी दिली.

श्री. विखे-पाटील यांनी रविवारी (ता. २१) येथील वारणा दूध संघाच्या दुग्धालय व कॅडबरी प्रकल्पास भेट दिली. नाबार्डने अनुदान बंद केल्याची माहिती आमदार विनय कोरे यांनी त्यांना दिली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार डॉ. विनय कोरे यांनी स्वागत केले.

मंत्री विखे पाटील म्हणाले, वारणा हे सहकार, उद्योग क्षेत्रातील आदर्श मॉडेल ठरले आहे. वारणा दूध संघाच्या दुग्धजन्य पदार्थांनी देशातील बाजारपेठेत नावलौकिक प्राप्त केलेला आहे. म्हशीच्या दुधाची सध्या कमतरता आहे, त्यासाठी विविध उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संघाच्या दुग्धालयात उपाध्यक्ष एच. आर. जाधव व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत करून प्रकल्पाची माहिती दिली. मंत्री विखे-पाटील यांचा सत्कार वारणा समूहाचे प्रमुख डॉ. कोरे यांच्या हस्ते झाला. या वेळी खासदार धनंजय महाडिक, संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, संघाचे सर्व संचालक, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, विशांत महापुरे, केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, पन्हाळ्याचे प्रातांधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, महसूल व दुग्धविकास खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, सरकारचा निर्णय, पण साखर उतारा घटणार?

Crop Damage : घेवडा करपल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Water Management Meeting: जल व्यवस्थापन बैठकीस शासनाच्या अधिकाऱ्यांची दांडी

Surya Ghar Yojana : सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत ७४ हजार ग्राहक वीज निर्माते

Nashik APMC : पांजरापोळ प्रकरणात नाशिक बाजार समितीला दणका

SCROLL FOR NEXT