Farmer Loan Waive Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

आंबा, काजू बागायतदारांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्यावा

शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली. तत्पूर्वी देखील कर्जमाफीची योजना राबविण्यात आली. परंतु योजनेतील काही निकषांमुळे आंबा, काजू बागायतदार कर्जमाफीपासून वंचित राहिले.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (farmer Loan Waive Scheme) आंबा (Mango), काजू बागायतदारांना (Cashew Farmer) दोन लाखांवरील कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी आंबा, काजू बागायतदार संघाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.

शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली. तत्पूर्वी देखील कर्जमाफीची योजना राबविण्यात आली. परंतु योजनेतील काही निकषांमुळे आंबा, काजू बागायतदार कर्जमाफीपासून वंचित राहिले. शासनाने दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना माफी दिली. परंतु ज्यांची मुद्दल दोन लाख होती.त्याच्यावरील व्याजासह अनेक शेतकऱ्यांची रक्कम वाढली होती. त्यामुळे अशा असे अनेक बागायतदार या किल्ष्ट अटीमुळे वंचित राहीले.

त्यामुळे शासनाने २०१५ ते डिसेंबर २०१९ पर्यंत दोन लाख मुद्दल होती परंतु व्याजामुळे रक्कम वाढल्याने जे शेतकरी योजनेपासून वंचित राहीले त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी आंबा-काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी शासनाकडे दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत हनुमंत आंगचेकर, अनंत प्रभू, किशारे नरसुले, ॲड. प्रकाश बोवलेकर, श्यामसुंदर राय, राजेश परब आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT