Crop Loan
Crop Loan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Loan : मराठवाड्यात कर्जपुरवठा ६५ टक्क्यांवर

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपासाठी (Kharif Crop Loan) करावयाच्या कर्ज पुरवठ्याची (Loan Supply) उद्दिष्टपूर्ती हंगाम अर्धा लोटला असतानाही झालेली नाही. आठही जिल्ह्यांत केवळ ६५ टक्के उद्दिष्टपूर्ती (Crop Loan Target) झाली असून, परभणी जिल्हा कर्जपुरवठ्यात (Crop Loan Distribution) सर्वांत पिछाडीवर असल्याची स्थिती आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्याला ११ हजार ३२८ कोटी ३८ लाख ९८ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मिळालेल्या उद्दिष्टाचीपूर्ती करताना २३ ऑगस्ट अखेरपर्यंत मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह व्यापारी बँका व ग्रामीण बँकेने १० लाख ७५ हजार ८८८ शेतकऱ्यांना ७३७० कोटी २४ लाख ८४ हजार रुपये कर्जपुरवठा करत ६५.६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली.

कर्जपुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती करण्यात औरंगाबाद जिल्हा आघाडीवर असून, त्या पाठोपाठ बीड व लातूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. परभणी जिल्हा मात्र कर्जपुरवठ्याबाबत कमालीचा पिछाडीवर असून, २३ ऑगस्ट अखेरपर्यंत या जिल्ह्यात केवळ ४७.८४ टक्के कर्जपुरवठा झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा हंगामा आधी कर्जपुरवठा किंवा वेळेत कर्जपुरवठा करण्याचे शासन व प्रशासनाच्या आश्‍वासन बोलण्यापुरतीच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे.

जिल्हानिहाय उद्दिष्ट, प्रत्यक्ष कर्जपुरवठा व टक्केवारी (रुपयांत)

जिल्हा औरंगाबाद

उद्दिष्ट १३५४ कोटी ५९ लाख १७ हजार

कर्जपुरवठा १०५३ कोटी २४ लाख ८८ हजार

शेतकरी १ लाख ७२ हजार ७३०

टक्केवारी ७७.७५

जिल्हा जालना

उद्दिष्ट १२१९ कोटी ८९ लाख १६ हजार

कर्जपुरवठा ७७९ कोटी ९० लाख ६२०००

शेतकरी १ लाख १५ हजार ४६८

टक्केवारी ६३.९३

जिल्हा परभणी

उद्दिष्ट १२०४ कोटी १५ लाख ३४०००

कर्जपुरवठा ५७६ कोटी १२ लाख ६१ हजार

शेतकरी ८११३६

टक्केवारी ४७.८४

जिल्हा हिंगोली

उद्दिष्ट ८३९ कोटी ९९ लाख १६ हजार

कर्जपुरवठा ४५० कोटी ९५ लाख २० हजार

शेतकरी ७१७५९

टक्केवारी ५३.६९

जिल्हा लातूर

उद्दिष्ट २ हजार कोटी

कर्जपुरवठा १३६६ कोटी १ लाख ९७ हजार

शेतकरी २ लाख २१ हजार ८१

टक्केवारी ६८.३०

जिल्हा उस्मानाबाद

उद्दिष्ट १३६८ कोटी २० लाख

कर्जपुरवठा ७८५ कोटी ७३ लाख

शेतकरी १ लाख १ हजार ९२

टक्केवारी ५७.४३

जिल्हा बीड

उद्दिष्ट १७६० कोटी

कर्जपुरवठा ११६७ कोटी ७३ लाख ५६ हजार

शेतकरी १ लाख ५४ हजार ६२८

टक्केवारी ६६.३५

जिल्हा नांदेड

उद्दिष्ट १५८१ कोटी ५६ लाख १५ हजार

कर्जपुरवठा ११९० कोटी ५३ लाख

शेतकरी १ लाख ५७ हजार ९९४

टक्केवारी ७५.२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT