Lemon  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

लिंबू फळपिकासाठी विमा योजना

मृग बहर-२०२२ मध्ये लिंबू पिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.

विनयकुमार आवटे

मृग बहर-२०२२ मध्ये लिंबू पिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. लिंबू पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल. लिंबू बाग वय वर्ष ४ पूर्ण झालेल्या उत्पादन क्षम बागेस विमा संरक्षण राहील.

विमा संरक्षण कालावधी आणि प्रमाणके

मृग बहार २०२२-लिंबू पिकासाठी हवामान धोके

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) ---विमा संरक्षण कालावधी--- प्रमाणके (ट्रीगर) व नुकसानभरपाई (रुपये प्रति हेक्टरी)

कमी पाऊस ----१५ जून ते १५ जुलै ---या कालावधीत एकूण १०० मि.मी.ते १५० मि.मी. दरम्यान पाऊस झाल्यास १७,५०० रुपये

---- या कालावधीत एकूण १०० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाल्यास ३५,००० रुपये

पावसाचा खंड व जास्त तापमान --- १६ जुलै ते १५ ऑगस्ट--- या कालावधीत सलग १५ ते २१ दिवसांचा पावसात खंड पडून दिवसाचे जास्तीत जास्त तापमान कोणत्याही दिवशी ३५ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास १७,५०० रुपये

--- या कालावधीत सलग २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यास आणि दिवसाचे जास्तीत जास्त तापमान सलग ३ दिवस ३५ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास ३५,००० रुपये

टीप ः २.५ मि.मी. पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडला तरी तो खंड समजण्यात येईल

१) विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर ७०,००० रुपये

२) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ३,५००/- ते १२,२५० रुपये प्रति हेक्टरी.

३) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. मात्र एकूण वास्तव दर्शी विमा हप्ता ३५ टक्क्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरवायच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.

४) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.

५) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

६) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पिक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पास बुकवरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि कंपनी

जिल्हे ---- विमा कंपनीचे नाव

नगर, अमरावती, नाशिक, वाशीम, धुळे, सोलापूर --- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,

बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, परभणी, जालना, लातूर---एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद---भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड

१) अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहार पैकी, कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल .

२) एक शेतकरी ४ हेक्टर च्या मर्यादेत विमा संरक्षण घेवू शकतो.

३) शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in

४) भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक १४ जून २०२२.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन संकेत स्थळ www.maharashtra.gov.in वर दिनांक १८/०६/२०२१ रोजीचा संबंधित शासन निर्णय पहावा. आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

----------------

(लेखक कृषी आयुक्तालय, पुणे येथे मुख्य सांख्यिक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT